शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाळधी येथील सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 16:59 IST

१० फूट लांबीच्या अजगरास पकडून सर्पमित्राने जीवदान दिले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरजसर्पास न मारता, सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवा

पाळधी, ता.जामनेर : येथे १० फूट लांबीच्या अजगरास पकडून सर्पमित्राने जीवदान दिले आहे.रब्बी हंगाम सुरू झाला असून, गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत परिसरात असलेल्या गारव्यामुळे अनेक विषारी सर्प पाण्याच्या ठिकाणी वास करत असून, यामुळे शेतकºयांना रात्री अंधारात सर्पदंश होण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितित शेतकºयांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.सोमवारी पहूर परिसरातील शेतकरी फकिरा नथ्थू घोंगडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये मोटार ठेवण्याच्या जागेवर बसलेल्या अजगराचे दर्शन शेतकरी फकिरा घोंगडे यांना घडले. या अजगराचे अगडबंब रूप पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ पाळधी येथील नाना माळी या सर्पमित्राला बोलविले. त्यानंतर सर्पमित्र नाना माळी यांनी १० फूट लांबीच्या अजगरला पकडले. नाना माळी यांचे धाडस पाहून शेतकºयांनी त्यांंचे आभार मानत कौतुक केले.सर्पमित्राने अजगरास जामनेर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांच्या ताब्यात दिले. अजगराला सुरक्षित अधिवासात सोडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एल.राणे व डॉ.एस.एस.व्यवहारे यांनी प्रथमोपचार केले. परिसरामध्ये साप आढळल्यास त्याच्यावर हल्ला न चढविता, त्याला न मारता सर्पमित्राच्या माध्यमातून जंगलामध्ये सोडण्याची व्यवस्था केल्यास अन्नसाखळी अबाधित राहते, असे वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी सांगितले.काही जातीचे साप विषारी, काही निमविषारी, तर काही बिनविषारी जातीचे असतात. सर्पमित्र साप पकडतात म्हणून कोणीही साप पकडण्याचे धाडस करू नये. कारण अपूर्ण माहितीच्या आधारे चुकीच्या पद्धतीने सापडल्यामुळे दंश झाल्यास जीवावरसुद्धा बेतू शकते. त्यामुळे युवकांनी विश्वासू सर्पमित्रांशीच किंवा माझ्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असेही वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले.पाळधीसह परिसरात कोठेही मानवी वसाहतीत साप निघाल्यास मला माहिती देतात. आजपर्यंत कुणाकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जवळपास ७०० सापास पकडून वनअधिवासात सोडून दिले आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण होत आहे. -नाना माळी, सर्पमित्र, पाळधी

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर