शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नेते अ‍ॅड.गोविंद पानसरे हत्येप्रकरणात साकळीच्या युवकाच्या सहभाग यावल तालुक्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:48 IST

तीन महिन्यांपूर्वी नाला-सोपारा बाँबस्फोटप्रकरणी तर आता आधुनिक विचारसरणीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने यावल तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास अटक केल्याचे ‘लोकमत’ वाचताच साकळीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपूर्वीच घेतले होते ताब्यातदहशतवादाची साखळी तालुक्यातपर्यंत पोहोचल्याचा धक्का

यावल, जि.जळगाव : सुमारे तीन महिन्यांपूर्वी नाला-सोपारा बाँबस्फोटप्रकरणी तर आता आधुनिक विचारसरणीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने यावल तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास अटक केल्याचे ‘लोकमत’ वाचताच साकळीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.गेल्या तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी या २८ वर्षीय युवकास ६ सप्टेंबर रोजी नालासोपारा बाँम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेतले होते, तर दुसऱ्याच दिवशी साकळी येथील लोधी वाड्यातील विजय उर्फ भैया उखर्डू लोधी (वय २८) या युवकास ताब्यात घेतल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती.गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई दहशदवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या या युवकांपैकी शनिवारी बंगळुरू येथील एसआयटीच्या पथकाने वासुदेव सूर्यवंशी यास ज्येष्ठ नेते अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात मारेकºयांना दुचाकी व विस्तुल पुरविल्याप्रकरणी शनिवारी अटक केल्याचे ठळक वृत्त रविवारी ‘लोकमत’ने पहिल्याच पानावर घेतल्याने साकळीसह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.दहशतवादाचंी ही साखळी तालुक्यापर्यंत पोहोचली असल्याचे पाहून तालुकावासीयांना प्रचड धक्का बसला आहे. साकळीच्या दोन्ही युवकांना एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे आजपर्यंत गावासह तालुक्यात माहीत होते, मात्र अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येत सूर्यवंशी सहभागी होता. तसेच हत्येच्या कटासाठी वेळोवेळी झालेल्या बैठकीसही तो हजर असल्याचे वाचून तालुकावासीयांना प्रचंड धक्का बसला आहे. गेल्या १५ वर्षापासून अनेक वर्षापासून गावात मोटारसायकल दुरूस्तीचे गॅरेज चालवणारा आणि अध्यात्माची ओढ असलेला शिवभक्त म्हणून वासुदेवची गावात ओळख होती. या वृत्ताने साकळीकरांना प्रचंड धक्का बसला आहे. गावात आज जागोजागी या वृत्ताचीच चर्चा होती. वासुदेव सूर्यवंशीच्या या वृत्तामध्ये विजय उर्फ भैय्या उखर्डू लोधी याचे नाव नसल्याने त्याचे काय झाले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल