निरीक्षकांना धरले धारेवर
शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे तेथे शनी पेठचे निरीक्षक विठ्ठल ससे आलेले होते. भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व इतर कार्यकर्त्यांनी ससे यांना चांगलेच धारेवर धरले. पोलिसांच्या समक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात आंदोलन केले. पोलिसांनी एक प्रकारे त्यांना संरक्षणच दिल्याचा आरोप केला. त्यावर ससे यांनी तुमची पण तक्रार घेतली जाईल असे सांगितले. याच वेळी माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी पोलीस ठाणे गाठून नारायण राणे यांच्याविरुध्द लेखी तक्रार दिली. महापौर जयश्री महाजन, मनपाचे विरोध पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, नगरसेवक गणेश सोनवणे, मंगला बारी यांच्यासह भाजपच्या दिप्ती चिरमाडे, प्रकाश महाजन व इतरांनी पोलीस ठाणे गाठले होते.
सोन्याची पोत ओढल्याची तक्रार
भाजप कार्यालयात आंदोल करीत असताना भाजप कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची तक्रार ज्योती शिवदे व शोभा चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. याचवेळी सोन्याची पोत देखील ओढली असून ती मिळून येत नसल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सुनील महाजन, कुलभूषण पाटील यांनी मारहाण केल्याची तक्रार
भाजपचे कार्यालय मंत्री प्रकाश भगवानदास पंडीत यांनी शहर पोलिसांना लेखी तक्रार दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की दुपारी १ वाजता महापौरांचे पती सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह ७० ते ८० जणांनी भाजप कार्यालयावर हल्ला चढवून मारहाण केली. सुनील महाजन, कुलभूषण पाटील व पाच ते सहा महिलांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन छातीवर कोंबडी फेकून धमकी दिली. सुभाष शौचे, भाजयुमोचे महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, गौरव पाटील यांना देखील मारहाण झाली असून त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सर्वांचे तक्रार अर्ज स्विकारले.