शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची स्वबळाची तयारी: खान्देशातील २० जागांसाठी ४२ जणांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:21 IST

जळगाव- ३०, धुळे- ८ आणि नंदुरबार -४ जणांचा समावेश

जळगाव/धुळे/नंदुरबार : खान्देशातील २० जागांसाठी शिवसेनेकडून ४२ इच्छूकांचा मुलाखती बुधवारी मुंबईच्या शिवसेना भवन येथे घेण्यात आल्या. जिल्ह्यातील ११ जागांसाठी एकूण ३० जणांनी, धुळे जिल्ह्यातील पाच जागांसाठी ८ आणि नंदुरबार येथील चार जागांसाठी ४ जणांनी मुलाखती दिल्या. रावेर मतदारसंघासाठी सर्वात जास्त १० जणांनी मुलाखती दिल्या.मंगळवारपासून उत्तर महाराष्टÑातील ४७ जागांसाठी मुलाखतींना सुरुवात झाली असून, मंगळवारी चाळीसगावसाठी मुलाखती झाल्या होत्या. उर्वरित १० जागांसाठी बुधवारी मुलाखती झाल्या. खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख संजय सावंत, रवींद्र मिर्लेकर आदींनी या मुलाखती घेतल्या. जळगाव ग्रामीणसाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, एरंडोलसाठी माजी आमदार चिमणराव पाटील व पाचोऱ्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी मुलाखती दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.पाटील यांनी दिली नाही मुलाखतअमळनेरमधून राष्टÑवादीचे पदाधिकारी अनिल पाटील यांनी मुलाखत दिली नाही. दरम्यान, ते या जागेसाठी इच्छूक असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला. तसेच त्यांचे नाव वरिष्ठांना कळविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अमळनेरसाठी भैय्या साळूंखे, वजय पाटील व नगरसेवक संजय पाटील यांनी मुलाखती दिल्या.चोपड्यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे त्यांच्या पत्नी लता सोनवणे व बंधू श्यामकांत सोनवणे तसेच डी.पी.साळूंखे यांनी मुलाखत दिली.नंदुरबारसाठी चौघांच्या मुलाखतीनंदुरबार : शिवसेनेतर्फे चारही मतदार संघातील प्रत्येकी एका इच्छुकाने मुंबई येथे मुलाखत दिली. नंदुरबार मतदार संघासाठी मालती वळवी, शहादा-तळोद्यासाठी मतदारसंघासाठी रिना पाडवी आणि अक्कलकुवा मतदारसंघासाठी आमशा पाडवी यांनी मुलाखत दिली. नवापूर मतदारसंघासाठी देखील एकजण इच्छूक आहे. दरम्यान, पक्षाकडे आणखी काही इच्छूक असून त्यात दिग्गजांचा समावेश आहे. परंतु युतीसंदर्भात काय निर्णय होतो यावर त्यांचा प्रवेश आणि उमेदवारी अवलंबून राहणार असल्याची माहिती शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी दिली.धुळे जिल्हाधुळे जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदार संघासाठी आठ जणांनी मुलाखती दिल्या. यात धुळे शहर - धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे माजी आमदार प्रा.शरद पाटील, महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, माजी महानगर प्रमुख सतीश महाले, विद्यार्थी सेनेचे पंकज गोरे आणि डॉ.सुशील महाजन यांनी मुंबईत मुलाखती दिल्यात.धुळे ग्रामीण - मतदारसंघातून एकमेव शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी मुलाखत दिली.शिंदखेडा - मतदारसंघातून जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे आणि पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी मुलाखत दिली आहे.जळगाव शहरासाठी भंगाळे, महाजन इच्छूकजळगाव शहर मतदारसंघासाठी विष्णू भंगाळे व सुनील महाजन यांनी मुलाखती दिल्या आहेत. जामनेरसाठी जि.प.चे माजी सदस्य दीपक राजपूत व ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी मुलाखत दिली आहे. भुसावळसाठी ६ जण उपस्थित होते. मुक्ताईनगरसाठी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मुलाखत दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव