शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील बँकांना सुरक्षेबाबत सतर्कतेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:51 IST

आधीपासूनच काळजी घेतली जात असल्याचा दावा

ठळक मुद्दे इमारतींची दुरूस्ती करून घेण्याच्या सूचनासुरक्षा रक्षकांना अधिक सर्तकतेचे आदेशसुटीच्या दिवशीही कार्यालयाची पाहणी

जळगाव- नवी मुंबई येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेत भुयार खोदून त्याद्वारे प्रवेश मिळवून ३० लॉकर चोरट्यांनी फोडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.  त्या पार्श्वभूमीवर जळगावातील राष्टÑीयकृत व सहकारी बँकांच्या शाखांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर काही बँकांकडून पूर्वीपासूनच काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.खबरदारी घ्या, इमारतीची दुरुस्ती करून घ्यायुनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयाकडून तसेच नाशिक विभागीय कार्यालयाकडून याबाबत सर्वच शाखांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना ई-मेल द्वारे सूचना करण्यात आल्या आहेत. जळगाव शाखेलाही याबाबत ई-मेल प्राप्त झाला असल्याची माहिती मुख्य प्रबंधक अनिल पतंग्या यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यात इमारतीचे स्ट्रक्चर व्यवस्थित आहे ना? याची पाहणी करून काही दुरूस्ती आवश्यक असल्यास तातडीने दुरूस्ती करून घ्यावी. तसेच सतर्कता बाळगावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.नव्याने आदेश नाहीतमुंबईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर बँक आॅफ बडोदाच्या मुख्य शाखेकडून जळगाव शाखेला मंगळवारी दुपारपर्यंत सुरक्षेबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत कोणत्याही सुधारीत सूचना प्राप्त झालेल्या नव्हत्या.    बँकेचे व्यवस्थापक एम.आर. बडगे यांनी सांगितले की, पूर्वीपासूनच सुरक्षेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सीसीटीव्हीद्वारे बँकेच्या परिसरात लक्ष ठेवले जाते. तसेच सलग सुट्या आल्यास त्या दिवशी शहरातच असलेले अधिकारी शाखांमध्ये दिवसातून एक-दोन वेळा चक्कर मारून पाहणी करून घेतात. तसेच एटीएमच्या सुरक्षा रक्षकांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत.

सुरक्षेची पूर्ण काळजीबँक आॅफ इंडिया मुख्य शाखेचे व्यवस्थापक मनोहर डांगे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे लॉकर सुविधा नाही. मात्र तरीही सुरक्षेची पूर्ण काळजी आधीच घेण्यात आली आहे. मुख्य शाखा पहिल्या मजल्यावर असल्याने भुयार करण्यासारखा धोका नाही. मात्र तरीही अलार्म सिस्टीम बसविण्यात आली आहे. जर काही गडबड झालीच तर अलार्म वाजून त्याचा मेसेज पोलीस स्टेशनला, बँकेच्या व्यवस्थापकांना तसेच संबंधीत अधिकाºयाला लगेच जाईल. त्यामुळे अनुचित घटना टळू शकेल.