शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुपचूप स्वत:चा पगार वाढविला : जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकांची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 13:02 IST

इतिवृत्तात घुसवलेला विषय लक्षात आल्याने कारवाईं

जळगाव : जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) संजीवकुमार गौतम यांनी स्वत:चा पगार स्वत:च गुपचूप वाढवून घेऊन तो विषय बैठकीच्या इतिवृत्तात परस्पर घुसविल्याचे इतिवृत्त मंजुरीपूर्वी संघाच्या चेअरमन यांच्या लक्षात आल्याने गौतम यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना बडतर्फ करण्यात येणार होते, मात्र नुकसान नको म्हणून राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र याबाबत दूधसंघाकडून गुप्तता पाळली जात आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा दूध संघाची बैठक शनिवारी पार पडली. त्यावेळी मागील सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्याकडे आले.त्यात आयत्यावेळच्या विषयात गौतम यांचा पगार वाढविण्याचा व मे महिन्यापासून वाढीव पगाराची रक्कमही देण्याचा विषयही असल्याचे आढळून आले. हा विषय सभेत झालेला नसताना इतिवृत्तात कसा आला? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे कार्यकारी संचालक गौतम यांनीच गुपचूप हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले.लिमये यांच्या पगाराची बरोबरीयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार गौतम हे जिल्हा दूध संघात कार्यकारी संचालक पदावर परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण करीत होते. त्यामुळे त्यांना १ लाख ८२ हजारांच्या आसपास होता.मात्र यापूर्वीचे कार्यकारी संचालक लिमये यांचा पगार २ लाख ३० हजार रूपये होता. त्यामुळे गौतम यांनी गुपचूप स्वत:चा पगार वाढवून घेत मे महिन्यापासूनची वाढीव पगाराची रक्कमही काढून घेतली. तसेच इतिवृत्तात आयत्यावेळच्या विषयात गौतम यांना पगारवाढ देऊन मे महिन्यापासून वाढीव पगाराची रक्कम (अ‍ॅरिअर्स) देण्याचा विषयही घुसडून दिल्याचे आढळून आले आहे. याबाबत संपर्क साधला असता ग्गौतम यांनी प्रतिसाद दिला नाही.राजीनामा घेतलासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परस्पर पगारवाढ करून घेत इतिवृत्तात विषय घुसडल्याचा विषय लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा झाली. तसेच गौतम यांना बडतर्फ करण्याबाबतही चर्चा झाली. मात्र त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केवळ राजीनामा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र गौतम यांनी अद्यापही पदभार सोडलेला नाही. मंगळवारी सोडण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी एकतर्फी पदभार काढून घेण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी दूध संघ भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते.

टॅग्स :Jalgaonजळगाव