सातगाव डोंगरी, ता.पाचोरा : सातगाव डोंगरी येथील पोस्टबेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रमशाळेतील १४ वर्षाखालील व्हॉलिबॉल संघाचा नाशिक विभागात दुसरा क्रमांक आल्याने संस्थेचे संस्थेचे चेअरमन संजय वाघ व प्राध्यापक भागवत महालपुरे यांनी त्यांचा सत्कार केला.प्रथम केंद्रस्तरावर या आश्रमशाळेचा १४ वर्षाखालील संंघ विजयी झाला. यानंतर प्रकल्प स्तरावर तथा जिल्हास्तरावर विजयी होऊन, नाशिक विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकापासून थोड्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर राहिला.सत्कार समारंभप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, आश्रमशाळा चेअरमन प्रा.भागवत महालपुरे, प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे, सहायक प्रकल्पाधिकारी सुनील चौधरी, ज्येष्ठ नागरिक शरीफ तडवी, मोहन बच्छे, बाबूलाल पवार, प्रल्हाद वाघ, मुख्याध्यापक डी. आर. वाघ, मुख्याध्यापक हिराजी बागवान, जी. एच. पाटील, व्ही. एस. पाटील, उत्तमराव मनगटे, डी. आर. पाटील, सुनील बच्छे, भारती पाटील, शुभांगी पाटील, के. बी. गायकवाड, आर.बी. लोहार, फिरोज खाटीक, राहुल पाटील, अक्षय भालेराव, ओमप्रकाश शेंडे, कमुद्दिन तडवी, इमाम तडवी, सखाराम चव्हाण, शरद वारुळे, सतीश पाटील, आनंद पाटील, सखुबाई तडवी, सयदाबाई तडवी, आमिनाबाई तडवी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला.
सातगाव आश्रमशाळेचा संघ विभागात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:31 IST
सातगाव डोंगरी येथील पोस्टबेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रमशाळेतील १४ वर्षाखालील व्हॉलिबॉल संघाचा नाशिक विभागात दुसरा क्रमांक आल्याने संस्थेचे संस्थेचे चेअरमन संजय वाघ व प्राध्यापक भागवत महालपुरे यांनी त्यांचा सत्कार केला.
सातगाव आश्रमशाळेचा संघ विभागात दुसरा
ठळक मुद्दे१४ वर्षाखालील व्हॉलिबॉल संघ चमकलासंस्थेतर्फे गुणवंत खेळाडूंचा सन्मान