शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

यावल येथील लाच प्रकरणात दुस-या पोलीस कर्मचा-यालाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 22:02 IST

यावल येथील लाच मागितल्याच्या एका प्रकरणात यावल पोलीस स्टेशनचे तत्कालिन कर्मचारी कैलास नारायण इंगळे यालाही मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी अटक केली. किरण पांडुरंग ठाकरे या कर्मचाºयाला सोमवारी सायंकाळी अटक झाली होती. याच गुन्ह्यात आरोपी असलेले यावलचे तत्कालिन तथा जिल्हा विशेष शाखेचे विद्यमान पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मात्र अद्याप अटक झालेली नाही.

ठळक मुद्दे पोलीस निरीक्षक हिरेंना अद्याप अटक नाही अटकेतील दोन्ही पोलिसांना कोठडी हिरेंसह तिघांच्या घराची झडती

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७: यावल येथील लाच मागितल्याच्या एका प्रकरणात यावल पोलीस स्टेशनचे तत्कालिन कर्मचारी कैलास नारायण इंगळे यालाही मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी अटक केली. किरण पांडुरंग ठाकरे या कर्मचाºयाला सोमवारी सायंकाळी अटक झाली होती. याच गुन्ह्यात आरोपी असलेले यावलचे तत्कालिन तथा जिल्हा विशेष शाखेचे विद्यमान पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मात्र अद्याप अटक झालेली नाही.

गुन्हा दाखल न करण्यासाठी यावल येथे २१ जानेवारी रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक बळीराम विठ्ठल हिरे, कर्मचारी किरण ठाकरे व कैलास इंगळे यांनी ८० हजार रुपये घेतले. त्याआधी १३ जानेवारी रोजी ४० हजार रुपये घेतले. २३ जानेवारी रोजी प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल मागितल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे सिध्द झाले होते. या पडताळणीत संशय आल्याने तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर हिसकावून त्याची तोडफोड करुन पुरावा नष्ट केला होता. त्यामुळे या तिघांविरुध्द यावल पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ भादवि कलम २०१ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इंगळे स्वत:हून एसीबी कार्यालयात हजरअटकेची टांगती तलवार कायम असल्याने कैलास इंगळे  मंगळवारी सकाळी स्वत:हून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर झाले. त्यानंतर साडे अकरा वाजता अटक करुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या डायरीला तशी नोंद करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केल्यानंतर इंगळे यांना भुसावळ येथे न्यायालयात नेण्यात आले. तेथील न्यायालयाने अटकेतील दोन्ही पोलिसांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली हिरेंसह तिघांच्या घराची झडतीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह अटकेतील पोलीस कर्मचारी कैलास इंगळे व किरण ठाकरे यांच्या घराची झडती घेतली, मात्र त्यात काहीही आढळून आले नाही. हिरे यांचे घर नाशिक येथे आहे तेथे त्यांच्या घराची झडती स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली तर इंगळे व ठाकरे यांची जळगावातील घराची झडती घेण्यात आली. तिघांच्या घरातून काहीही हाती लागले नाही, अशी माहिती उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी दिली.