शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये कुणबी जातीच्या नोंदींचा शोध सुरू; शासनाने मोडी लिपीतील नोंदीचे नमुनेही पाठवले

By अमित महाबळ | Updated: November 7, 2023 19:46 IST

शाळांमध्ये उपलब्ध अभिलेखात (जनरल रजिस्टर) दोन टप्प्यात नोंदी शोधायचे निर्देश आहेत.

जळगाव : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून, शाळास्तरावर कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही नोंदी मोडी लिपीतील असल्याने त्यामधील नोंदींचे नमुनेही शाळांना पाठविण्यात आले आहेत. 

शाळांमध्ये उपलब्ध अभिलेखात (जनरल रजिस्टर) दोन टप्प्यात नोंदी शोधायचे निर्देश आहेत. १९४८ पूर्वीचा कालावधी आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदींची संख्या दररोज सायंकाळी मुख्याध्यापकांच्या सही, शिक्क्यांसह गटशिक्षणाधिकारी यांना कळवायची आहे. शाळांच्या जनरल रजिस्टरमधील बऱ्याच नोंदी मोडी लिपीतील आहेत. ही भाषा माहित असणारे आता कमी आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाने मोडी लिपीत कुणबी नोंद कशी केलेली असेल याचे चार  नमुने शाळांना पाठवले आहेत. यामध्ये कुणबी, कुनबी, कु, कुणबी सदर आदींचा समावेश आहे. एरंडोल तालुक्यातील कढोलीमध्ये १८८३ ची नोंद सापडली आहे मात्र, जिल्हास्तरावर सर्व तालुक्यांतील नोंदी एकत्र झाल्यानंतर सर्वात जुनी नोंद कोणत्या तालुक्यातील आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती मिळाली. सध्या तरी हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी शिक्षक नोंदी तपासण्यात व्यस्त आहेत.  कागदपत्रे स्कॅन करा....जनरल रजिस्टरमध्ये तपासणी करताना कुणबी कागदपत्रे आढळून आल्यास त्यांचे स्कॅनिंग करून सांभाळून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. नोंदी तपासणीचे काम दि. ९ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण