शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या सुपुत्राने लावला स्पेक्टो फ्लोरोमीटरचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 08:16 IST

वैद्यकीय क्षेत्रातील (पॅथॉलॉजी) प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी लागणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ हे अमळनेर येथील विवेक भास्कर बोरसे या विद्यार्थ्यांने शोधून काढले आहे

चुडामण बोरसे जळगाव : वैद्यकीय क्षेत्रातील (पॅथॉलॉजी) प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी लागणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ हे अमळनेर येथील विवेक भास्कर बोरसे या विद्यार्थ्यांने शोधून काढले आहे. या संशोधनाबद्दल विवेकला ‘लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे’कडून उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.या संशोधनासाठी त्याने पेटंटची नोंदणीही केली आहे. विवेक हा आय.आय.टी. पवईचा विद्यार्थी आहे. वैद्यकीय प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी तसेच फ्लोरोसंट मोजण्यासाठी उपयुक्त ठरणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ यंत्र हे जर्मन बनावटीचे असते. त्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.पीएच.डी.करणारा विवेक भास्कर याने सहा महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या भारतीय बनावटीचे ‘स्पेक्टोफ्लोरो मीटर’ बनवले आहे. ते अवघ्या एक हजार रुपयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या पैशांची ९९ टक्के बचत होणार आहे.राष्ट्रपती भवनात गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या ‘इनोव्हेशन इन मेडीकल सायन्स अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी’ प्रदर्शनासाठी या संशोधनाची निवड झाली होती. शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, डॉ.रेणू स्वरूप, डॉ.सत्यादास इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चचे डॉ.सौम्य स्वामीनाथन, कार्यकारी अधिकारी प्रा.अनिल गुप्ता यांनी या संशोधनाबद्दल विवेकचे कौतुक केले होते.विविध प्रकाराचे निष्कर्ष काढण्यासाठी या नव्या संशोधनाची मदत होणार आहे. विवेक याचे हे संशोधन देशाला लाभदायी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब आॅफ नॉर्थ बॉम्बे संस्थेकडून विवेक यांचा ५० हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.यासाठी अभियांत्रिकी, कृषि, विज्ञान, औषध आणि वैद्यकीय शास्त्र या क्षेत्रातून अर्ज मागविण्यात आले होते. यात विवेक बोरसे याची निवड झाल्याने अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.विवेक हा अमळनेरातील भारत संचार निगम लिमिटेड कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर बोरसे यांचा मुलगा आहे.

आपल्या भारतीय बाजारातही वैद्यकीय साहित्य कमी किंमतीत मिळावे, हा आमचा हेतू होता, या गरजेतून हे नवीन यंत्र संशोधन केले आहे. यात आणखी काही बदल करता येईल काय? यावर आम्ही अभ्यास करीत आहोत.- प्रा. रोहित श्रीवास्तव, मार्गदर्शक. आयआयटी पवई.

संशोधनासाठी लागले सहा महिनेया ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’च्या संशोधनसाठी सहा महिन्याचा कालावधी लागला. यासाठी खर्च आला तो फक्त दीड हजार रुपये. या ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’मध्ये कलर सेन्सर, वायर्स, प्रोग्रामर आणि पाच व्होल्टची बॅटरी असे साहित्य लागले आहे. सुरुवातीला एक ते दोन डिझाईन्स तयार केले पण ते पसंतीला न पडल्याने पुन्हा प्रयोग करीत राहिलो आणि शेवटी यश मिळाले.- विवेक बोरसे, विद्यार्थी.