शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सातवीपर्यंत शाळा, १५१ विद्यार्थी, शिक्षक दोनच... सांगा कसं होणार मुलांचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 06:39 IST

शिक्षक नसलेल्या शाळेत खुद्द सरपंच महिला झाली शिक्षिका; शिकविण्यासाठी स्वखर्चाने केली दोघांची नियुक्ती

गोपाळ व्यासबोदवड (जि. जळगाव) : पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण... शाळेला आयएसओ नामांकन... तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा... विद्यार्थी संख्या १५१... शिक्षक मात्र दोनच.. सांगा कसं व्हायचं या मुलांचं? ही अवस्था आहे बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील शाळेची... 

शाळेत शुद्ध पाणी, डिजिटल फळा, संगणक आहे. सर्व सोयी आहेत; परंतु, शाळेत पुरेसे शिक्षकच नाहीत. एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षिका या दोघांवरच पूर्ण भार आहे. यामुळे पहिली ते सातवीपर्यंतचे सर्व वर्ग पटांगणात भरवून सर्वांना एकत्र शिकविले जात आहे. जून महिन्यापासून हे सुरू आहे; परंतु, मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने सोमवारी संतप्त गावकऱ्यांनी आपल्या पाल्याला शाळेतून घरी नेले.

...अन् दोन तरुणांना स्वत:कडून पगार

nया प्रकाराची चर्चा गावभर पसरल्याने मुक्तळ गावच्या महिला सरपंच पल्लवी जितेंद्र पाटील यांनी पतीशी याबाबत चर्चा केली. त्यांचे स्वत:चे एमए शिक्षण झाले असल्याने गावाच्या कारभार सोबत आता गावातील मुलांना शिकवण्याचा निर्धारही त्यांनी केला. nमंगळवारी सकाळीच स्वत: पदरमोड करत दोन उच्चशिक्षित तरुणींना पाच हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन देत त्यांना सोबत घेत शाळेचा रस्ता गाठला. 

शाळेत मुख्याध्यापक एस.आर. साठे यांच्याशी चर्चा करत शाळा भरवली. यामुळे सर्व पालक विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत हजर झाले व पुन्हा शाळा भरली.

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत स्वत: शिकवण्याचे धाडस केले. आणखी दोन शिक्षकही आपल्या खर्चाने महिनाभरासाठी दिले आहेत. शिक्षण विभागाने तत्काळ पुरेशा शिक्षकांची व्यवस्था करावी.- पल्लवी पाटील, सरपंच

दोघांवर ७ वर्गांचा भार 

‘अगोदर शिक्षक द्या, मगच आम्ही मुलांना शाळेत पाठवू, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू,’ असा पवित्रा  ग्रामस्थांनी घेतला.