शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

‘द स्कूल आॅफ अथेन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 13:04 IST

तत्त्वज्ञांची मांदियाळी

ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ भेटावी, अशी इच्छा प्रकट केली आहे. अशीच एक कल्पित मांदियाळी ‘द स्कूल आॅफ अथेन्स’ या चित्रामध्ये रंगवली आहे. व्हॅटिकन शहरातील ‘अ‍ॅपॉस्टॉलिक पॅलेस’ या वास्तूमध्ये हे भित्तीचित्र आहे. एका मोठ्या दालनाच्या चार भिंतीवर तत्त्वज्ञान, काव्य, ब्रह्मज्ञान आणि कायदा अशा चार ज्ञान शाखांचे प्रतीक, अशी चार चित्रं दिसतात. त्यातील ‘तत्त्वज्ञान’ विषयाचं प्रतीक असलेलं चित्र म्हणजे स्कूल आॅफ अथेन्स. ते रंगवलं आहे ‘राफाएल’ या प्रसिद्ध इटालियन चित्रकाराने. राफाएल हा ‘लिओनार्डाे दा विंची’चा समकालीन आणि त्याचाच शिष्य होता. त्याने सन १५१० च्या सुमारास ही कलाकृती रंगवली. १७ फूट बाय २५ फूट असं भव्य भित्तीचित्र आहे हे!या चित्रात दाखविलेलं ‘स्कूल आॅफ अथेन्स’ प्रत्यक्षातील नसून ते काल्पनिक आहे. खरंतर रूपकात्मक आहे. ग्रीक इतिहास हा जसा अनेक देव-देवतांच्या कथांनी भरलेला आहे, तसाच तो कित्येक तत्त्वज्ञांनी पण भरला आहे.... अगदी आपल्या इतिहासाप्रमाणे! अथेन्स हे ग्रीसमधील शहर एकेकाळी या तत्त्वज्ञांचे माहेरघर होते. त्यातले कित्येक पूर्णपणे निरीश्वरवादी होते. वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेलेले, वेगवेगळ्या ज्ञानशाखांचे हे तत्त्वज्ञ एका ठिकाणी, एका छताखाली एकत्र येऊन चर्चा करताहेत, अशी एक कविकल्पना करून ती राफाएलने चित्राच्या माध्यमातून मांडली आणि मग तत्त्वज्ञांच्या या जमावाला- मांदियाळीला त्याने नाव दिलं- ‘द स्कूल आॅफ अथेन्स’.चित्रात अगदी मध्यभागी ठळकपणे दिसणारी प्रमुख दोन पात्रं म्हणजे प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल. ते आपापल्या सिद्धांतावर चर्चा करताना दिसतात. उजव्या कोपºयात खाली आर्किमिडिज (किंवा युक्लिड) खाली वाकून काही भूमितीय आकृती काढतोय. पायºयांवरती ‘डायोजिनस’ हा साधू वृत्तीचा नि:स्संग तत्त्ववेत्ता पहुडला आहे.प्लेटोच्या डाव्या बाजूला त्याचा गुरू सॉक्रेटिस काहीतरी गहन विषय समजावतोय आणि ऐकणाºयांमध्ये स्वत: अ‍ॅलेक्झांडर द ग्रेटसुद्धा आहे. डाव्या हाताला खाली, हातात एक ग्रंथ घेऊन पायथॅगोरस काहीतरी नोंदी करतोय - तोच तो, भूमितीच्या पेपरमध्ये आपल्याला छळणारा पायथॅगोरस! अशी वीस एक पात्र ओळखू येतात. गंमत म्हणजे राफाएलने ही ऐतिहासिक पात्र किंवा व्यक्ती रंगवण्यासाठी त्याच्या काळातल्या प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे वापरलेत. एक प्रकारे त्याच्या परिचितांना त्याने कोणत्यातरी तत्त्वज्ञाच्या ‘भूमिकेत’ टाकलंय.उदाहरणार्थ- प्लेटो या मुख्य व्यक्तिरेखेचा चेहरा बघताक्षणी लक्षात येतं, की तो लिओनार्डाे दा विंची आहे. ‘हेराक्लिटस’ला चेहरा मायकेलँजेलोचा आहे आणि टॉलेमीच्या मागे कमानीजवळ एका छोट्याशा भूमिकेत स्वत: राफाएल आहे. तो चित्रात थेट आपल्याकडे बघताना दिसतो. या भित्तीचित्राची सुमारे अडीचशे वर्षांनंतर, म्हणजे १७५५ साली कॅनव्हासवर एक प्रतिकृती रंगवली गेली. योगायोगाची गोष्ट अशी की ही प्रतिकृती रंगवणारा जो कलाकार आहे, त्याचं नावसुद्धा ‘अ‍ॅण्टोन राफाएल’ असंच आहे. ते चित्र सध्या इंग्लंडमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये ठेवलं आहे.दा विंची, मायकेलँजेलो आणि राफाएल हे तिघे रेनेसन्सच्या कालखंडातील कलाजगतातले ‘अमर-अकबर-अँथनी’ होते, असं म्हणता येईल. त्यातला राफाएलची ‘द स्कूल आॅफ अथेन्स’ ही सर्वाेत्कृष्ट कलाकृती आहे!- अ‍ॅड.सुशील अत्रे

टॅग्स :Jalgaonजळगाव