शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
6
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
7
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
8
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
9
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
10
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
12
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
13
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
14
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
15
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
16
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
17
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
19
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
20
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

By अमित महाबळ | Updated: September 17, 2022 17:30 IST

खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

जळगाव - अनेकांना खरूज हा शब्द खाज एवढाच माहीत असतो. काहीजण इसम (eczema) याला खरूज म्हणतात पण खरे तर खरूज म्हणजे एका छोट्या किड्यामुळे शरीरावर झालेला संसर्ग असतो. हा किडा फक्त त्वचेवरच असतो आणि खाजेशिवाय तो शरीराला वेगळा काही त्रास देत नाही. पण त्यावर वेळीच उपाय न केल्यास जखमा होऊ शकतात. खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

काय आहे हा किडा?

पूर्वी हा किडा (Sarcoptes Scbiei Mite) फक्त प्राणी (पाळीव प्राणी - कुत्रा, मांजर) आणि जनावरांमध्ये आढळायचा, मात्र १७ व्या शतकात तो मानवी शरीरावर प्रामुख्याने दिसून आला. हा किडा डोळ्यांना न दिसणारा असून, एकदा संपर्क झाला की त्वचेच्या वरील भागात शिरून आपले घर तयार करतो. तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्वचेवर काहीतरी फिरल्यासारखे वाटून खाज यायला लगते.

जळगावमध्ये ३० टक्के प्रमाण

- १० वर्षांवरील लहान मुलांमध्ये याचे लक्षण पूर्ण शरीरभर दिसून येते. १० वर्षांनंतर याची लक्षणे मानेच्या खाली पूर्ण शरीरावर आढळून येतात. हा संसर्ग शाळेतील मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. जळगावमध्ये याचे प्रमाण ३० टक्के आहे.

- कुटुंबातील एका व्यक्तीला खरूज झाली की त्या कुटुंबातील लहान मुलांना पहिल्यांदा संसर्ग होतो आणि मग इतरांना. कारण एकाच्या शरीरावरून दुसऱ्या शरीरावर हा किडा जातो.

संसर्ग कसा होतो?

- हा किडा सगळ्यात पहिल्यांदा जिथे दुमडलेली त्वचा असते तेथून पूर्ण शरीरभर पसरत जातो.- सगळ्यात पहले लक्षण हे हाताच्या बोटांमध्ये, दुमडलेली त्वचा आणि मनगटावर दिसते.- ‘एस’आकारचे व्रण, जे लालसर आणि पुटकुळ्यांसारखे वाटतात.- पहिल्या १० दिवसांत या पुटकुळ्या पूर्ण शरीरभर दिसतात.

लक्षणे

- दिवस-रात्र कधीही याची खाज अंगाला येत राहते. पण अति खाजेमुळे त्वचेला जखम होऊ शकते.- अंगाला लाल पुटकुळ्या येतात, सतत हात व त्वचा खाजवणे हे या रुग्णांमध्ये दिसते.

काय घ्यावी काळजी

- शरीराची स्वच्छता- दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ- घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता- पाळीव प्राण्यांना खरूज असेल तर ती ठीक होईपर्यंत घरातील त्यांचा वावर टाळणे.- आपल्या घरात जर कोणाला खरूज झाली असेल तर त्याचे टॉवेल, साबण, कपडे, बेडशीट, अंथरूण, पांघरूण संसर्ग बरा होईपर्यंत सर्व वेगळे ठेवावे.

डॉक्टर म्हणतात 

खरूजचे योग्य निदान न करता काही व्यक्ती वेगवेगळे मलम, औषधी बाजारातून आणून स्वतःच्या मनाने लावतात आणि त्वचा अजून खराब करून घेतात. योग्य निदान हे फक्त त्वचारोग तज्ज्ञ करू शकतात. ज्ञानाला अनुभवाची जोड लागते. हा किडा एका दिवसात निघून जाणारा नाही. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत व घरातील संसर्ग टाळावा, असे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग सल्लागार डॉ. कोमल गव्हाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव