शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

घरात तीन दिवस डांबून ठेवलेल्या दिव्यांग सोहेलला धुळ्य़ाच्या केंद्रामध्ये हलविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 12:51 IST

पोलीस कल्याण निधीतून खर्च करणार

ठळक मुद्देमुलाला इतरत्र हलविण्याचा निर्णय पित्याला दिला समज

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - तीन दिवस घरात डांबून ठेवलेल्या सोहेल रिंकू तडवी या दिव्यांग बालकाला देखभालीसाठी धुळे येथे दिव्यांग तसेच मतीमंद मुलांच्या केंद्रामध्ये हलविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बालकाच्या प्रवेश व इतर खर्चासाठी पोलीस कल्याण निधीतून खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले. या मुलाला घरात तीन दिवस डांबून ठेवल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ बालकाच्या पित्याला बोलावून समज देण्यात आला व या मुलाला इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस लाईन भागात राहणारे व पोलीस खात्यातून निलंबित असलेले रिंकू तडवी हे त्यांचा मुलगा सोहेल या सहा वर्षीय दिव्यांग बालकाला घरात कोंडून गेले होते. सलग तीन दिवस हा बालक घरातच बंद होता. त्यानंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या मुलाला जिल्हा रुग्णलायात दाखल केले व आठवडाभरापासून पोलीसच त्याची देखभाल करीत होते. या संदर्भात ‘लोकमत’ने 25 रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर रिंकू तडवी यांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आला व या बालकाच्या देखभालीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. धुळ्य़ाला हलविणारदिव्यांग, मतीमंद मुलांच्या देखभालीसाठी धुळे येथे  केंद्र असून तेथे सोहेलला दाखल करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला असून त्यासाठी लागणारा खर्च पोलीस कल्याण निधीतून करण्यात येणार आहे. 

सोहेल तडवी या बालकाच्या पित्याला आज समज देण्यात आला असून बालकाला धुळे येथे हलविण्यात येणार आहे. - सुनील गायकवाड, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठ पोलीस ठाणे.