शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी प्रकल्प कार्यालयात सव्वाकोटीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:12 IST

पाच प्रकल्प अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

यावल, जि. जळगाव : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनेअंतर्गत सन २००५ ते २०१० या कालावधीत तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी व अन्य एकाने तसेच कर्मचाऱ्यांनी १ कोटी वीस लाख ४ हजार ८८५ रुपयांचा अपहार केला असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून अकोला येथे बदलून गेलेले आर. बी. हिवाळे यांनी यांनी दिलेल्या फियार्दीवरून येथील पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहेयेथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दुधाळ जनावरे वाटप करणे, आदिवासी विवाहित जोडप्यांना मंगळसूत्राचे वाटप करणे व संसार उपयोगी भांड्यांचे वाटप करणे या योजनेअंतर्गत हा अपहार झालेला आहे यात २००५ ते २००८ मध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी तारासिंग पाडवी यांनी दीपक लॅब नांदगाव यांना २० मंगळसूत्र व भांडी याची आॅर्डर दिली होती त्यात दोन लाखाचा अपहार झालेला आहे. तर २००५ ते २००६ या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी एन. एम. निकुंभे यांनी २५७ मंगळसूत्र व भांडी संच यामध्ये पंचवीस लाख रुपयाचा अपहार केला. त्यानंतर सन २००८ ते २०१० या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी जी. एन. वळवी यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेत सागर सुधाकर धामणे यांच्या पंकज मच्छीमार सोसायटी अमळनेर आशापुरी माता शेळी मेंढीपालन अमळनेर या एजन्सीच्या नावे ६१ लाख ६८हजार २४० रुपयाचा अपहार केला. २००६ ते २००७ या काळात तत्कालीन प्रकल्प अधिकारी टी. बी. पाडवी, एस. इ. उमाळे ए. एम. थोरात यांनी तीस मंगळसूत्र व भांडी संच यात ३ लाख रुपयांचा अपहार केला आहे. सन २००८ ते २०१० या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी जी. एन. वळवी यांनी एचडी पीव्हीसी पाणीपुरवठा योजनेत १ हजार ७३९ पाईप पुरवठा करण्यासाठी ३ लाख ३२ हजार ६०५ रुपयाचा अपहार केला आह. २००७ ते २००८ या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी एन. एम. निकुंभ यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेत ८३ शेळी गटांना वाटप केल्याचे दर्शवून २५ लाख रुपयाचा अपहार केल्याची फियार्दीत म्हटले आहे. याप्रकरणी ५ प्रकल्प अधिकारी व तत्कालीन कर्मचारी व अन्य एजन्सी यांचेवर १ कोटी २० लाख ४ हजार ८४ ५ रुपयाच्या रकमेचा अपहाराचा ठपका ठेवलेला आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी