शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या तिघांची हिमालयात यशस्वी 'सारपास' ट्रेकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:00 IST

चाळीसगाव, जि. जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनेश देशमुख, व्यावसायिक नीलेश शर्मा, दीपेश जैन या तिघा तरुणांनी नुकतीच हिमालयातील 'सारपास' ट्रेक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. ४ ते १२ जून दरम्यानच्या या मोहिमेत ते ३३ गिर्यारोहकांच्या चमूत सहभागी झाले होते.जून महिन्यात हिमालयात २५०० मीटर उंचीच्या शिखरापासून १३,५०० पेक्षा अधिक मीटर उंच ...

ठळक मुद्देमोहीम फत्ते१३,५०० फूट उंचावरील चढाई यशस्वी

चाळीसगाव, जि. जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनेश देशमुख, व्यावसायिक नीलेश शर्मा, दीपेश जैन या तिघा तरुणांनी नुकतीच हिमालयातील 'सारपास' ट्रेक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. ४ ते १२ जून दरम्यानच्या या मोहिमेत ते ३३ गिर्यारोहकांच्या चमूत सहभागी झाले होते.जून महिन्यात हिमालयात २५०० मीटर उंचीच्या शिखरापासून १३,५०० पेक्षा अधिक मीटर उंच सारपासपर्यंत मोहिमेत गिर्यारोहकांचा सहभाग असतो.प्रतिकुल हवामानविरळ हवा, प्रखर सौर किरणे,तीव्र वारा आणि दररोज बदलणार तापमान अशा परिस्थितीत जून महिन्यात या ‘सारपास चमूने’ ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली.देवभूमी हिमायलाच्या पार्वती खोऱ्यात कासोलपासून हा ट्रेक सुरू होतो. त्यात दररोज १२ ते १७ किमी. चढाई करणे अग्नीदिव्य ठरते. शून्यअंश तापमान, हाडे गोठवून टाकणारी थंडी, वेगाने वाहणारे वारे आणि लवकर न संपणारा पायी प्रवास. अशी संकटांची वाट तुडवावी लागते. हिमवर्षा देखील परिक्षा घेतच असते. वाट अवघड असल्याने जराही तोल गेला की, थेट मृत्यूशी गळाभेट होण्याची भीती असते.अन् आम्ही मृत्यूच्या जबड्यात...वरवर जाताना श्वास घेणे अवघड होत होते. मध्येच धो धो कोसळणारा पाऊस, वादळवारा होता. आमच्यातील तीन ते चार गिर्यारोहक श्वासाच्या त्रासामुळे खाली कोसळले. गलितगात्र तिघांना उचलून आम्ही अखेरीस सारपास ट्रेक पूर्ण केलाच. आम्ही सर्वांनीच तो रोमांचकारी क्षण एकमेकांची गळाभेट घेऊन साजरा केला.- दिनेश देशमुख, नीलेश शर्मा, दीपेश जैन, गिर्यारोहक, चाळीसगाव.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव