विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील पूर्णाड येथील महिला सरपंच प्रा.मनीषा देशमुख यांनी त्यांचे पती संदीप दिनकरराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत तोच पैसा मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कोविड कक्ष तसेच व्हेंटिलेटर आणि आॅक्सिजनयुक्त तयार होत असलेल्या कक्षासाठी आर्थिक मदत केली.तहसीलदार श्याम वाडकर यांच्याकडे हा धनादेश गुरुवारी सुपूर्द करण्यात आला. धनादेश देताना प्रा.मनीषा देशमुख यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, संदीपराव देशमुख, भूषण पाटील, अभयसिंग देशमुख उपस्थित होते.विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर-निमखेडी जिल्हा परिषद गटाचे जि.प.सदस्य नीलेश पाटील यांनीदेखील आपल्या वाढदिवसानिमित्त ११ हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द केला होता.
पतीच्या वाढदिवसानिमित्त सरपंचांनी आॅक्सिजन पाईपलाईनसाठी दिली आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:41 IST
पतीच्या वाढदिवसानिमित्त सरपंचांनी आॅक्सिजन पाईपलाईनसाठी आर्थिक मदत दिली
पतीच्या वाढदिवसानिमित्त सरपंचांनी आॅक्सिजन पाईपलाईनसाठी दिली आर्थिक मदत
ठळक मुद्देपूर्णाड येथील महिला सरपंच प्रा.मनीषा देशमुख यांचे योगदानउपक्रमाचे उपस्थितांनी केले स्वागत मुक्ताईनगर तहसीलदारांकडे धनादेश सुपूर्द