शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत एक सरंपच, 30 सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:48 IST

सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी घेतली माघार

ठळक मुद्दे 163 उमेदवार रिंगणातसात ग्रामपंचायतचे 30 सदस्य बिनविरोध

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15- तालुक्यातील 11 ग्रामपंचायतसाठी दाखल केलेल्या एकूण 278 उमेदवारांपैकी गुरुवारी माघारीच्या दिवशीच्या सरपंच पदाच्या 15 तर सदस्य पदाच्या 69 उमेदवारांनी माघार घेतली असून  आता 163 उमेदवार रिंगणात आहे. तालुक्यातील 11 ग्रामपंचायतपैकी सात ग्रामपंचायतचे एकूण 30 सदस्य बिनविरोध ठरले आहेत तर पळसोद ग्रामपंचायतच्या सरपंच यापूर्वीच बिनविरोध ठरल्या आहेत. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु आह़े जळगाव तालुक्यात सरपंचपदासाठी 44 तर सदस्यपदासाठी 234 अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जाची मंगळवारी छाननी होऊन यात एकही अर्ज अवैध ठरला नव्हता. त्यानंतर गुरुवारी माघारीच्या दिवशी सरपंचपदाच्या 15 तर सदस्यपदाच्या 69 उमेदवारांनी माघार घेतली. 

सात ग्रामपंचायतचे 30 सदस्य बिनविरोधपळसोद ग्रामपंचायतचे 7, निमगाव बु. - 7, खेडी खुर्द - 1, डोणगाव - 3, लोणवाडी बु. - 6, विटनेर - 2, जामोद- 4 एवढे सदस्य बिनविरोध ठरले आहे. पळसोद ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी राधाबाई पंकज पाटील यांचा एकमेव अर्ज  अर्ज आलेला होता व तो अर्ज वैध ठरल्याने सरपंचपदी राधाबाई पाटील यांच्या बिनविरोध निवडवर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता सरपंचपदासाठी 28 तर सदस्यपदासाठी 135 असे एकूण 163 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.