शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
4
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
5
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
6
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
7
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
8
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
9
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
10
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
11
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
12
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
13
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
14
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
15
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
16
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
17
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
18
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
19
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
20
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क

साक्री, नवापूरच्या दरोड्यातील आरोपींना जळगावात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:35 IST

साकी, नवापूर येथे वाहने अडवून दरोडा टाकणाºया टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून जळगावातील दोन तर धुळ्यातील दोन अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, दरोड्याच्या पैशातून विकत घेतलेली महागडी दुचाकी, चोरीचा मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नवाबखान गुलाब खान (रा.मकरा पार्क, जळगाव), महमद मुददसर आलम शेख (रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव), जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी (दोन्ही रा.धुळे) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत.

ठळक मुद्देजळगाव पोलिसांची कारवाई एअरगन, मोबाईल, दुचाकी जप्तदरोड्यातील मोबाईलमुळे फुटले बींग

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११: साकी, नवापूर येथे वाहने अडवून दरोडा टाकणाºया टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून जळगावातील दोन तर धुळ्यातील दोन अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, दरोड्याच्या पैशातून विकत घेतलेली महागडी दुचाकी, चोरीचा मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नवाबखान गुलाब खान (रा.मकरा पार्क, जळगाव), महमद मुददसर आलम शेख (रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव), जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी (दोन्ही रा.धुळे) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवाबखान गुलाब खान (रा.मकरा पार्क, जळगाव) हा कोणताही काम धंदा करीत नसताना त्याच्याकडे महागड्या दुचाकी, अतिशय महागडे बूट व उच्च राहणीमान यामुळे पोलिसांच्या रडारवर आला होता. अशातच साक्री येथील इकबाल मोहम्मद मुस्तफा (रा.धुळे) या साडी व्यापाºयाला १ लाख ९७ हजारात लुटल्याच्या घटनेत जळगावच्या नवाब याचा समावेश असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांचे पथक तयार केले होते.

दरोड्यातील मोबाईलमुळे फुटले बींगपोलिसांनी नवाब याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेला मोबाईल हा साडी व्यापाºयाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ‘खाकी’ हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली देत जळगावचा महंमद शेख व धुळ्यातील जावेद अन्सारी अख्तर हुसेद व अहमद उस्मान अन्सारी यांचे नाव सांगितले. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पथकाने जळगावच्या दोघांना सोबत घेत मंगळवारी धुळे गाठले. एकाला पावणे अकरा वाजता तर दुसºयाला मध्यरात्री दीड वाजता ताब्यात घेवून जळगावात आणले. या चौघांनी नवापूरजवळ ट्रॅव्हल्स बसवर दरोडा टाकून हवाल्याचे २१ लाख रुपये लुटल्याची कबुली दिली. बुधवारी सायंकाळी चौघांना नवापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.