शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमधील संजय पवार, नरेंद्र पाटील यांच्याविरुध्द मानहानीचा दावा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:33 IST

‘मविप्र’ प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकाराक आरोप केल्याप्रकरणी संजय पवार, विजय पाटील, नरेंद्र पाटील व इतरांविरुध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे भोईटे गटाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमराठा विद्या प्रसारक संस्थेचा वाद  हस्तांतर सुनावणी पुढे ढकलली न्यायालयात अपयश आल्याने वैफल्यग्रस्तातून आरोप

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ : ‘मविप्र’ प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकाराक आरोप केल्याप्रकरणी संजय पवार, विजय पाटील, नरेंद्र पाटील व इतरांविरुध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे भोईटे गटाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी म्हटले आहे.  भोईटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या शिक्षण विभागाने भोईटे गटाच्या संचालक मंडळाच्या बाजूने आदेश दिले आहेत. दोन महिने उलटून अनेक प्रयत्न केल्यानंतर उच्च न्यायालयात स्थगिती मिळविण्यात अपयश आल्याने विजय पाटील व त्यांचे साथीदार अपयश झाकण्यासाठी वांरवार पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकारक आरोप करीत आहेत. संस्थेच्या इमारत ताब्याबाबत औरंगाबाद खंडपीठ व तहसीलदारांकडे प्रकरणे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत.तसेच शिक्षण विभागाचे आदेशसुध्दा खंडपीठाने कायम ठेवले आहे, त्यामुळे अस्तित्व संपुष्टात येत असल्याची भीती पाटील गटाला वाटत आहे. न्यायालयात देखील आपण टिकू शकणार नाही, हे मागील दोन महिन्याच्या प्रयत्नावरुन दिसून येत आहे. न्यायालयात थारा मिळत नसल्याने हा गट हतबल झालेला आहे. दरम्यान, कायदा हातात घेणाºयांविरुध्द जिल्हाधिकाºयांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी निलेश भोईटे यांनी केली आहे.  हस्तांतर सुनावणी पुढे ढकलली  महाविद्यालय पदभार हस्तांतर प्रकरणी नरेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीचे कामकाज १३ एप्रिल रोजी न्यायालयाने एक महिन्यासाठी पुढे ढकलले आहे. या याचिकेतील ‘जैसे थे’चे आदेश कायम आहेत.