शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 18:02 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पाचोरा, जि. जळगाव : पाचोरा नगरपरिषदेचे शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय नाथालाल गोहील यांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र घोषीत केल्यामुळे राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.पाचोरा येथील नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली होती. त्यात अनुसूचित जाती या राखीव संवर्गातून संजय नथालाल गोहील हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र निवडूणक झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी तक्रार पराभूत उमेदवार अजय भास्कर अहिरे यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी चौकशी करून मुदतीत वैधता प्रमाणपत्र दिले नसल्याचे सिध्द झाल्यामुळे गोहिल यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्याचा निकाल २३ जानेवारी २०१९ रोजी दिला. या निकालामुळे पाचोरा मतदार संघात खळबळ उडाली असून पुढे येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील, अशी चर्चा पाचोरा मतदार संघात सुरू झाली आहे.पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे अजय भास्कर अहिरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते व सोबत सदरची जागा ही अनु. जातीसाठी राखीव असल्याने निवडून आल्याच्या ६ महिन्याच्या आत मुदतीत दाखल करावयाचे हमीपत्र लिहून दिले होते. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर संजय गोहील निवडून आले. गोहील यांनी ६ महिन्याच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अजय अहिरे यांनी जिल्हाधिकाºयांकडे ७ सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार अजय अहिरे यांच्यावतीने अ‍ॅड . विश्वासराव भोसले व अ‍ॅड. महेश देशमुख (उच्च न्यायालय , औरंगाबाद ) यांनी काम पाहिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव