आमडदे, ता. भडगाव : येथे कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नाशिक यांच्या माध्यमातून जळगाव जिल्हा सॅनिटायझर फवारणी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
भडगाव तालुका शेतकी संघाचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमडदे गावाचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू चैत्राम पाटील यांच्याहस्ते नारळ फोडून सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आमडदे गावात सर्वत्र सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. या कामासाठी कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे डॉ. सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुपरवायझर रवी भोसले व त्यांचे सर्व सहकारी यांच्याद्वारा ही मोहीम सर्वत्र राबविण्यात येत असून भडगाव पाचोरा तालुक्यात सॅनिटायझर फवारणी प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने व जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या प्रयत्नाने करण्यात आली.
280721\img-20210723-wa0251.jpg
आमडदे ता भडगाव