शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात महसूल कर्मचा-याला ट्रॅक्टरखाली फेकून वाळू माफिया फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:04 IST

अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त

ठळक मुद्देभरधाव वेगाने पळविले ट्रॅक्टरअवैधरीत्या वाळू उपसा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- महसूलच्या अधिका:यांनी जप्त केलेल्या अवैध वाळू उपसा करणा:या ट्रॅक्टरवरुन महसुल विभागाच्या एका कर्मचा:याला मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी खाली फेकून जप्त केलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास दुध फेडरेशन जवळील पेट्रोल पंपासमोर घडली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निमखेडी येथील गिरणा नदीपात्रातुन अवैधरीत्या वाळू उपसा होत असून, शुक्रवारी निमखेडी रस्त्यावरील कांताई नेत्रालय समोर माजी नगरसेवक कैलास सोनवणेंसह काही जणांनी अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर अडविले होते. याबाबतची माहिती कैलास सोनवणे यांनी तहसिलदार अमोल निकम यांना दिली. मात्र निकम हे जिल्हाधिका:यांसोबत बैठकीत उपस्थित असल्याने, त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांना निमखेडी शिवारात जावून संबंधित ट्रॅक्टर जप्त करण्याचा सूचना दिल्या. दोन्ही ट्रॅक्टर केले जप्त दरम्यान, खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालयातील रविराज बाविस्कर, शिपाई भिमराव देसले व तहसिलदार यांच्या गाडीचे चालक सचिन पाटील यांना सोबत घेवून कांताई नेत्रालय येथे पोहोचले व दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले. दीपक चव्हाण यांनी  एका ट्रॅक्टरवर शिपाई भिमराव देसले यांना बसवून हे ट्रॅक्टर तहसिल कार्यालयाकडे नेण्यास सांगितले. तर दुस:या ट्रॅक्टरवर चालकासह रविराज बाविस्कर यांना बसविले.  चव्हाण हे तहसिलदारांच्या वाहनात बसून ट्रॅक्टर मागे येत होते. देसले  चालवित असलेले ट्रॅक्टर सुरु होत नसल्याने तेथेच थांबले होते. भरधाव वेगाने पळविले ट्रॅक्टरएक ट्रॅक्टर सुरु होत नसल्याचे पाहून दुस:या ट्रॅक्टर चालकाने महसुल कर्मचा:याला बसवून भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविले. त्यानंतर हे ट्रॅक्टर दुध फेडरेशन समोरील भाग्यश्री पेट्रोल पंपा जवळ आल्यानंतर तीन ते चार मोटारसायकलस्वारांनी त्यांना गाठत ट्रॅक्टर रस्त्यात थांबविल्यानंतर महसुल कर्मचा:याचा हात धरून ट्रॅक्टर वरुन फेकून दिले. यात त्या कर्मचा:याला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर फेकून त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर दिपक चव्हाण यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रय} केला. मात्र ते पसार झाले. वाळू माफियांची वाढती ‘दबंग’गीरीनिमखेडी येथील गिरणा नदीपात्रातुन अवैधरीत्या वाळू उपसा सुरुच असून वाळू माफियांना लगाम लावणा:या महसूल प्रशासनाला वाळू माफियांचा वाढत्या दबंगगीरीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.