शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 19:01 IST

महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देपोलीस कवायत मैैदानातील प्रकारट्रॅक्टरमालक व चालकाविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव, जि.जळगाव : महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती अशी की, २५ जानेवारी २०१९ रोजी अवैध गौणखनिज पथकातील तलाठी पी.एम.महाजन व तलाठी दिनेश यडे यांनी टाकळी प्र.चा. येथे हसतखेळत या हॉटेलसमोर रात्री साडेआठच्या सुमारास वाळूने भरलेले ट्रॅक्टर टाकळी प्र.चा.कडून चाळीसगावकडे येत असताना पकडले. पथक ट्रॅक्टर चालकाची विचारपूस करीत असताना चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. पथकाने पाठलाग करूनही चालक सापडला नाही. त्यामुळे जप्त केलेले विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर व ट्रॉली व त्यातील एक ब्रास वाळू पोलीस कवायत मैदानावर आणले.मात्र हे ट्रॅक्टर १३ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी भागवत आनंदा चव्हाण हे पाहण्यासाठी गेले असता सदर ट्रॅक्टर जागेवर आढळून आले नाही. हे ट्रॅक्टर १२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस कवायत मैदानावर होते. मात्र आज सकाळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर गायब झाल्याचे आढळून आले. हे ट्रॅक्टर व ट्राली पळवून नेल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक (नाव गाव माहीत नाही) व मालक नितीन महाजन यांच्याविरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.काही दिवसांपासून तालुक्यात वाळू चोरीचे प्रकरण चांगलेच गाजत असताना आता चक्क पोलीस कवायत मैदानातून वाळू चोरीप्रकरणी पकडण्यात आलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.

टॅग्स :sandवाळूChalisgaonचाळीसगाव