शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल पथकाच्या ताब्यातून वाळूचे ट्रॅक्टर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:43 IST

दापोरा ग्रामस्थांनी पकडले होते ट्रॅक्टर

दापोरा, ता. जळगाव : दापोरा येथील गिरणा नदीपात्रात अवैद्य वाळूचा उपसा सुरूच असून शनिवार, २० रोजी ग्रामस्थांनी महसूल पथकाच्या ताब्यात दिलेले वाळूचे ट्रॅक्टर चालकाने पळवून नेले. ५ रोजीदेखील अश्याच प्रकारे ग्रामस्थांनी पकडलेले ट्रॅक्टर पळविले होते मात्र त्यावेळीदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.२० रोजी नदीपात्रात वाळूचा उपसा सुरू असताना नदीपात्रात माजी सरपंच गोविंदा तांदळे यांच्यासह ग्रामस्थ नदीपात्रात पोहचले. त्यावेळी नदीपात्रात ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टर मालक विकास ऋषिदास कोळी, रा.दापोरी, ता.एरंडोल यांच्या मालकीचे ट्रॅक्टरवाळू भरत होते. या ट्रॅक्टरवर क्रमांक एम.एच. १९, एपी.९४४५ क्रमांक होता तर ट्रॉलीवर क्रमांक एम.एच१९, डीएन ८८३७ क्रमांक होता. भरलेले वाळूचे ट्रॅक्टर नदीपात्रातून गावात आणले व दापोरा तलाठी सारिका दुरगुडे यांना माहिती दिली. तलाठ्यांसोबत मंडल अधिकारी अक्षय वाघ, तलाठी प्रवीण बेंडाळे, वनराज पाटील व बावीस्कर महसूल यंत्रणेचे पथक आले व पंचनामा करत असताना चालक ऋषिदास कोळी याने ट्रॅक्टर सुरू करून पळवून नेले.महसूल पथकाला न जुमानता समोरून ट्रॅक्टर पळवून नेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाळू माफियाकडून अशाच प्रकारे नेहमी पकडलेले वाहने पळून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. कारवाईत सातत्य ठेऊन पोलीस यंत्रणादेखील सोबत ठेवावी, अशी मागणी होत आहे.तालुका पोलिसात गुन्हा दाखलतलाठी सारिका दुरगुडे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसात चालक विकास ऋषिदास कोळी, रा.दापोरी, ता.एरंडोल यांच्याविरुद्ध अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव