शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

धरणगाव ‘तहसील’मधून जप्त वाळूचे ट्रॅक्टर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:29 IST

तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देधरणगाव पोलिसांत दोघांविरूद्ध गुन्हाबांभोरीच्या ट्रॅक्टर चालक व मालकाचा आरोपींमध्ये समावेशधरणगाव तहसीलदारांनी दिली पोलिसात फिर्याद

धरणगाव : तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धरणगाव तहसीलदारांनी २७ सप्टेंबर रोजी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्र.एमएच २० एएम ४९९३ हे पकडून दंड वसूलीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. सदर ट्रॅक्टर पाच दिवस तहसील आवारात कारवाई साठी लावले होते.मात्र हे ट्रॅक्टर २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी संबधित मालकाने चोरीची वाळूसह दंड न भरता गायब केल्याची बाब उघड झाली. त्यानंतर महसूल पथकाने नेमके ट्रॅक्टर कुणी गायब केले याबाबत चौकशी सुरु केली. त्यावेळी हे ट्रॅक्टर संबधित मालकाने गायब केल्याची बाब समोर आली. त्यानंतर तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला येत फिर्याद दिली. त्यानुसार मालक सुदाम सोनवणे (रा.बांभोरी प्र.चा.ता.धरणगाव) व चालक या दोघांविरुध्द ३ लाख किंमतीचे ट्रॅक्टर, एक लाख किंमतीचे ट्रॉली, तसेच पाच हजार रुपये किंमतीची चोरीची वाळू दंड न भरता चोरुन (पळवून) नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पो.निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जोशी हे करीत आहे. अवैध वाळू वाहतुकदाराची मुजोरी हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :DharangaonधरणगावJalgaonजळगाव