शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

विदर्भात वाळू तस्करी करणारा डंपर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 7:12 PM

विदर्भात वाळू तस्करी करणारा डंपर जप्त करण्यात आले

ठळक मुद्देमुक्ताईनगर तहसील पथकाची कारवाईवाळू तस्करी करणारा डंपर आहे मलकापुरातील

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील नायगाव, पिप्रीनांदू व बेलसवाडी परिसरातील तापी नदी पात्रातून थेट विदर्भातील मलकापूर, बुलडाणा, अकोला परिसरात वाळू तस्करी होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर महसूल विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई करीत विदर्भात वाळू तस्करी करणारा मलकापूर येथील डंपर जप्त केला आहे.अंतुर्ली परिसरातील वाळू घाट असलेल्या गावांच्या तापी नदी पत्रात जेसीबी व पोकलॅण्डद्वारे हजारो ब्रास वाळूची तस्करी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. अगदी बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रात्री वाहतूक करून वाळू तस्करी केली जात आहे. यामुळे नदीपत्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पिकांची प्रचंड नासधूस होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडेही निवेदन देण्यात आले होते. याची तत्काळ दखल घेतली गेली.शुक्रवारी रात्री साडे नऊला तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, तलाठी गणेश मराठे, मुंढे व इतर महसूल कर्मचारी तसेच एक पोलीस कॉस्टेबल यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एमएच-२८-बीबी-७६३७ वाळूने भरलेले डंपर पकडले. त्यास पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. सोमवारी दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.डंपरला ट्रॅकरवाळू तस्करी करणाºया विदर्भातील या डंपरला वाळू माफियांनी ट्रॅकर बसविले होते. पुरणाड फाट्यावर पकडलेले हे डंपर मुक्ताईनगर प्रवर्तन चौकातून पोलिसात नेण्यास भुसावळ रोडकडे वळताच डंपर बंद पडले. लागलीच कारवाईपासून वाचविण्यासासाठी फोनाफानी सुरू झाली. ट्रॅकरवरून डंपरने रस्ता बदलला हे वाळूमाफियांना लगेच कळले.अन् महसूल विभागाने टोचन लावलेडंपर शहरातील एसटी डेपोसमोर येताच चालकाने त्याने इंजिन जाम झाल्याचा बहाणा करीत महसूल कर्मचाºयांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी डेपोतील कर्मचाºयांच्या मदतीने टोचन लावून एका चारचाकी वाहनांच्या मदतीने डंपर नेण्याचा निर्णय घेतला. टोचनही लावले. परत वाहन पुढे जाईना. शेवटी एसटी डेपोतील हेल्पर यांनी डंपर सुरू केले आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोहचवून दिले.

टॅग्स :sandवाळूMuktainagarमुक्ताईनगर