शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचा बाजार ‘गरम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:42 IST

जळगाव : जिल्ह्यातील वाळू गटांपैकी निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव झालेले नसले तरी जिल्ह्यात सर्वदूर वाळूंचा सर्रास उपसा सुरू ...

जळगाव : जिल्ह्यातील वाळू गटांपैकी निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव झालेले नसले तरी जिल्ह्यात सर्वदूर वाळूंचा सर्रास उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. ज्या गटांचा लिलाव झालेला नाही, तेथूही वाळू उपसा होत असण्यासह वाळूवरूनच वादही उद््भवू लागल्याने वाळूचा बाजार चांगलाच तापला आहे.वाळू निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असला तरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव अद्यापही झालेले नाही. तीन गट शासकीय राखीव असून केवळ १२ गटांचे लिलाव झाले आहे. १६ गटांचे लिलाव अद्याप होणे बाकी आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात वाळू लिलाव प्रक्रिया होते. मात्र यंदा नागपूर खंडपीठाने वाळू लिलावाबाबत दिलेल्या निर्णयामुळे सुरुवातीला निविदा प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यानंतर पर्यावरण समिती बरखास्त केल्याने पुन्हा ही प्रक्रिया रखडली. अखेर मार्च महिन्यात लिलाव प्रक्रिया सुरू झाली. त्यात तीन गट राखीव ठेवण्यात आले. उर्वरित गटांपैकी केवळ १२ गटांचे लिलाव झाले व १६ गटांचे लिलाव होणे बाकी आहे.आव्हाणी, ता. धरणगाव, बाभुळगाव, ता. धरणगाव, जामोद, ता. जळगाव हे गट शासकीय राखीव गट म्हणून ठेवण्यात आले आहेत तर सावखेडा, ता. जळगाव, माहिजी, ता. पाचोरा, कुरंगी, ता. पाचोरा, रुंधाटी, ता. अमळनेर, झुटकार, ता. चोपडा, पथराळे, ता. यावल, बेलव्हाळ -१,ता. भुसावळ, बेलव्हाळ - २, ता. भुसावळ, बेलव्हाळ - ३, ता. भुसावळ, जोगलखेडा, भुसावळ, पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर, भानखेडा, ता. भुसावळ या गटांचे लिलाव झाले आहेत. मात्र थोरगव्हाण, ता. यावल, पिंप्री, ता. यावल, धुरखेडा, ता. रावेर, दोधे, ता. रावेर, वाक, ता. भडगाव, बुधगाव, ता. चोपडा, सावखेडा, ता. अमळनेर, नेहते, ता. रावेर, निंभोरा बु. ता. रावेर, तामसवाडी, ता. पारोळा, नारणे, ता. धरणगाव, वैजनाथ, ता. एरंडोल, नागझिरी, ता. जळगाव, उंदीरखेडे भाग - २, ता. पारोळा, रुंधाटी, भाग - १, ता. अमळनेर, घाडवेल, ता. चोपडा हे गट अद्यापही लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत.असे असले तरी वाळू उपसा जोरात सुरू असून आव्हाणे येथे नदीपात्रात तर ट्रॅक्टरची जत्रा भरत असल्याचे दिसून येते. याच वाळूवरून खेडी-कढोली येथे वाद झाल्याने वाळूचे सर्वत्र ‘चटके’ जाणवू लागले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव