——
जनजागृती गरजेची
भुसावळ : भुसावळ रेल्वेस्थानकावर अनेक भागातून प्रवासी येत असतात. मात्र बरेच प्रवासी नजर चुकवून तपासणी न करता शहराकडे जातात. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवासी वर्गात रेल्वे प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे असून, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
—-
वीज अखंड मिळावी
अमळनेर : परिसरात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. पाणीसाठे मुबलक असल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, मका, हरभरा, भुईमूग व काही ठिकाणी फळपिकांची लागवड झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठ्याची गजर आहे. बऱ्याच वेळेस भारनियमनाचा त्रास होतो. अखंड वीज मिळावी अशी मागणी आहे.