नांदेड .ता. धरणगाव : साळवा येथे ग्रामपंचायतीमार्फत गावातील विठ्ठल मंदिरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ५२२ नागरिकांनी लसीकरण झाले.
ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने लसीचे ५०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ . छाया तांदळे , डॉ . अभिजीत नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी जे .एस. पाटील, एस. एस. ठाकूर, डी.सी. सोनगीरे, एम. पी. गोसावी, उदय बोरसे, डी.पी. नवले, एम.बी. महाजन, एस. एस. पाटील, जिजाबराव पाटील यांच्यासह आशा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर सरपंच ईशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, ग्रामविकास अधिकारी पी .पी. मराठे, ग्रा.पं. सदस्य भूषण बऱ्हाटे, मनोज अत्तरदे, आशा कोल्हे, चंद्रलेखा पवा , बैमाबी पटेल यांनी योग्य नियोजन ठेवून सहकार्य केले . हे कॉ . प्रदीप पवार , पोलीस पाटील निसार पटेल यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने लसीकरण शांततेत पार पडले .
---
२५/१
240921\img-20210924-wa0038.jpg
साळवा ग्रा .पं.मार्फत आयोजीत लसीकरण शिबीराचा शुभारंभ करतांना जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे व उपस्थीत ग्रा.पं. पदाधिकारी