शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जलसंधारण योजनेतील कार्यकर्त्यांना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:22 IST

सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन ...

सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन पाण्याचा फक्त उपसाच करण्याची स्पर्धा सुरू आहे़ तुरळक ठिकाणी जलसंधारणाचे कार्य सुरू असून काही उत्साही कार्यकर्ते धडपड करीत आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी अडावद, चिंचोली व आडगाव(मनुदेवी) येथील ग्रामस्थ यंदा सातपुड्यातून येणारे पाणी काही प्रमाणात अडवून जिरविण्याचे कार्य करीत आहे़ यातील चिंचोली व आडगाव येथे १०० ते १५० फूट खोल विहिरींच्या माध्यमातून बागायती क्षेत्र तग धरून होते़ परंतु २०१२, २०१५, २०१८ या दर तीन व वर्षांनी येणाऱ्या दुष्काळामुळे विहिरींचे पाणी तर संपलेच परंतु चारशे ते पाचशे फूट बोअरवेल करूनही पुरेसे पाणी नाही़ चिंचोली येथे अशोक साठे, अनिल साळुंखे, अशोक बेहडे, विकास साळुंखे, अनिल साठे, संजय साळुंखे, विजय पाटील, प्रशांत साठे,निरज बेहडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून पाणी अडविण्याचे कार्य करीत आहे़आडगाव येथे मनुदेवी संस्थानाची भरीव आर्थिक मदत तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून सातपुड्याच्या पायथ्यापासून पालक नाला ठिकठिकाणी खोल करून छोटे, छोटे डोह करण्याचे कार्य सुरू केले आहे़ या कामात शांताराम पाटील, नितीन पाटील, गोकुळ पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभाग देत आहे़ अडावद हे पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव पिण्यासाठी पूर्णत: बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहे़ गावाच्या वरच्या भागातून जाणाºया हतनुरच्या कालव्याचे पावसाळ्यात पाणी सायफन करून नाल्यांमध्ये थोड्या प्रमाणात पुनर्भरण केले जात होते़ येथेही भूजल पातळी यावर्षी चारशे फुटांवर खाली गेल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे़ यावर उपाय म्हणून येथील भटू महाजन, प्रेमराज पवार, पी़ आऱ माळी, गौरव कासट, सचिन महाजन यांनी गावात जागृती केली़ तीन नाल्यांमधून गाळ काढून शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत झाली़ नाल्यांमध्ये निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये तब्बल तीन कोटी लिटर इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली़ दुष्काळाने बागायती पट्टाही अडचणीत आल्यामुळे लोक स्वयंप्रेरणेने कार्यरत होत आहेत़ आता पाणी अडवणे व जिरवणे या कामी लोकांची मानसिकता तयार होत आहे हे उत्तमच़-डॉ़ हेमंत पाटील, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव