शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील महिलेची गुजरातमध्ये ४५ हजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 11:53 IST

धक्कादायक : सुप्रीम कॉलनीतील दोन महिलांचा सहभाग, लग्नाच्या स्वयंपाकासाठी नेले होते

ठळक मुद्देम्हैसाणा येथे महिलेचे वास्तव्य

जळगाव : अहमदाबाद शहरात लग्नाचा स्वयंपाक करण्यासाठी नेलेल्या शहरातील ३५ वर्षाच्या महिलेला जळगाव व गुजरात येथील महिलांच्या मदतीने ४५ हजार रुपयात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचा पती व मुलीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत राहणारी अलकाबाई व कमलबाई या दोन महिलांनी ज्योती (नाव बदल केले आहे) हिला अहमदाबाद येथे लग्नसमारंभात जेवण बनविण्याचे काम घेतले आहे, तेथे कामाला चल असे सांगून आॅक्टोबर महिन्यात कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशीच अहमदाबाद येथे नेले.बरेच दिवस झाल्यानंतर ज्योती घरी आली नाही म्हणून पती व मुलीने अलकाबार्ई व कमलबाई यांच्याकडे चौकशी केली असता, तुझ्या आईला ४५ हजार रुपयात विक्री केली आहे. परंतु तीन दिवसात ती परत येईल असे या दोघींनी सांगितले.दीड महिना झाला तरी ज्योती परत आली नाही म्हणून पतीने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. त्यावरुन २ डिसेंबर २०१८ रोजी हरविल्याची नोंद घेण्यात आली.दरम्यान, अहमदाबाद येथे असताना ज्योती हिने सलग आठ दिवस कुटुंबांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क ठेवला होता. त्यानंतर संपर्क बंद झाला. त्यामुळे जळगावातील कुटुंबीयांची चिंता वाढली होती.म्हैसाणा येथे महिलेचे वास्तव्यम्हैसाणा येथे पिंटू नावाच्या व्यक्तीला ज्योती हिला विकण्यात आले. कमल व अलका यांना तेथे लिलाबेन या महिलेने मदत केली. तेथे तिचे नाव सुनिता ठेवण्यात आले असल्याची माहिती ज्योती हिच्या मुलीने अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आईला कोणी विक्री केले, कोणाला विक्री केले याची सर्व माहिती देऊनही पोलिसांकडून दखल घेतली नसल्याचे यात म्हटले आहे.विरोधानंतरही नेले ज्योतीलाअलकाबार्ई व कमलबाई या दोन्ही अहमदाबाद येथे कामाला नेत असल्याचे ज्योती हिने पती व मुलीला सांगितले असता त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ज्योती हिला दोन्ही जण बाहेर घेऊन गेल्या. तेथून दुपारी चार वाजता आई परत आली असता तिने कपडे बदल केले होते व अवस्थाही वाईट होती. त्याबाबत विचारणा केली असता आई घाबरलेली होती व माहिती देण्यास नकार दिला. त्याच दिवशी रात्री ती अहमदाबाद येथे गेली असे मुलीचे म्हणणे आहे.हरविल्याची नोंद झाल्यानंतर तपासासाठी अहमदाबाद व म्हैसाणा येथे जावून आलो. मात्र ज्योतीची भेट झाली नाही. ज्या व्यक्तीकडे आहे,त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क केला होता. तेव्हा ज्योती ही बोलली. मी लग्न केलेले आहे, त्यामुळे जळगावला येवू शकत नाही असे तिने सांगितले. तपास पूर्ण झालेला नसल्याने आणखी एकदा गुजरातमध्ये जाणार आहे. -राजाराम पाटील, तपासाधिकारीमाझ्या आईची विक्री करणाऱ्या अलकाबाई, कमलबाई व लिलाबेन यांचा महिलांना विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करुन आईची सुटका करावी.-सारिका, ज्योतीची मुलगी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी