विलास बारीजळगाव : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जळगाव शहरातील नागरिकांनी थर्टी फस्टच्या पार्टीचे आयोजन केले होते. व्हेज खाणाऱ्यांनी पावभाजी, शेवभाजी तसेच भरीतच स्वाद घेण्यास पसंती दिली. त्यामुळे रविवारी शहरात बेकरी विक्रेत्यांच्या दुकानांवर पावलादी घेण्यासाठी नागरिकांची सायंकाळी एकच गर्दी झालेली होती. जळगाव शहरात सुमारे ३५ हजार पावांच्या लाद्यांची विक्री झाली असल्याचा अंदाज बेकरी व्यवसायिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.
नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ठिकठिकाणी थर्टी फस्टच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. काही नागरिकांनी घरीच बेत आखलेला होता. तर काहींनी पाच ते सहा घरांनी एकत्र येत घरांच्या गच्चीवर कुंटुबांसह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रविवारची सुट्टी असल्याने थर्टी फस्ट साजरा करण्याचा उत्साह चांगलाच नागरिकांमध्ये दिसून आला.
३५ हजार पावांच्या लाद्यांची विक्रीथर्टी फस्टला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पावभाजीचा मेनू पार्टीत ठेवला होता. अनेकांनी बेकरी व्यवसायिकांकडे आधीपासून पावांच्या लाद्यांची ऑडर दिली होती. तर काहींनी घरांजवळील दुकान, बेकरी, दुध केंद्र आदी ठिकाणांवरून पाव लाद्यांची खरेदी केली. चित्रा चौकातील बेकरी विक्रेत्यांनी दुकानाबाहेर पावांच्या लादी विक्रीचे स्टॉल लावले होते. सायंकाळी पाव लाद्या खरेदीसाठी नागरिकांची या स्टॉलवर मोठी गर्दी झाली होती.
शेवभाजी सेंटरवर गर्दीथर्टी फस्टला शेवभाजी तसेच भरीतवर देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खायला पसंती दिली. शहरातील शेवभाजी व भरीत सेंटरवर सायंकाळी चार पासून शेवभाजी घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी झालेली होती. तर काही ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या.
थर्टी फस्टसाठी पावांच्या लाद्यांची मागणी लक्षात घेता नियोजन केले होते. रविवार आल्याने मार्केटमध्ये गर्दी कमी होती. मात्र संध्याकाळच्या वेळी पाव लाद्याची विक्री चांगली झाली.दिपेंद्र पाटील. बेकरी व्यावसायिक.