शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

साकेगावच्या कन्येने हरविले कोरोनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:24 IST

विश्वासाच्या बळावर ‘कोरोना’ला हरवून गावी आली असता तिचा जल्लोषात सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देनायर हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांची सेवा करत असताना झाली होती लागणस्वत:च्या गावी साकेगाव येथे झाला सन्मानमुंबईला होती एकटी

वासेफ पटेलभुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी नयना  पाटील मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करीत असताना ‘कोरोना’ची लागण झाली. विश्वासाच्या बळावर ‘कोरोना’ला हरवून गावी आली असता तिचा जल्लोषात सन्मान करण्यात आला.नयना पाटील मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून गेल्या चार वर्षांपासून सेवा करीत आहे. मुंबई येथे झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. रुग्णांच्या उपचारासाठी नायर हॉस्पिटललाही कोरोना डेडिकेट करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून औषधीच्या माध्यमातून कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करीत असताना, बाधा होण्याची दाट शक्यता असल्याची आधीच कल्पना होती. मात्र बाधितांना सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य यासाठी जराही न डगमगता नयनाने अविरत सेवा सुरू ठेवली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्रास जाणवू लागल्याने स्वत:हून स्वॅब दिला. अहवाल पॉझिटिव्ह आला. यावेळी मात्र मन विचलित झाले. मात्र स्वत:तल्या आत्मविश्वासाला ढळू दिले नाही. मानसिकदृष्ट्या स्वत:ला धीर दिला. आपण यावर नक्की मात करू व नायर येथे उपचार केल्यानंतर पूर्णत: बरी झाली. उपचार घेत असताना सोबतच्या रुग्णांना हिंमत व बळ दिले. वेळोवेळी रुग्णांना विविध व्यायाम करण्याचे सांगितले व स्वत: केले. कोरोनाला साकेगावच्या कन्येने हरवून लढाई जिंकली.मुंबईला होती एकटीनयनाचे पती केनिया येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. आई-वडील साकेगाव येथे राहतात. मुंबईला एकटी राहून कर्तव्य पार पाडत होती. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई येथील हॉटेल ताजमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळ कोणीही हिंमत द्यायला नसताना मित्र-मैत्रिणी व स्टाफच्या सहकाऱ्यांनी धीर व आधार दिला. स्वत:मध्ये आत्मविश्वास जागवून नक्कीच आपण लढाई जिंकू, ही मनाशी गाठ बांधली होती. याचा सकारात्मक परिणाम झाला. आज पूर्णत: बरी होऊन ती साकेगावला परतली आहे.गावी आली असता जि. प.सदस्य रवींद्र पाटील, माजी उपसरपंच विनोद पवार, प्रमोद पाटील, अमृत पवार, राजेंद्र पवार, चंद्रकांत पवार यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी तिने केलेल्या कोरोना रुग्णांच्या सेवेचा अभिमान बाळगून व कोरोनाला हरवून गावी परत आल्यानंतर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ