शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र जळाल्याने साकेगावकरांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:24 IST

साकेगाव येथे रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून साकेगावकर अंधारात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात अंधार असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

भुसावळ : उत्साह, आनंद आणि चैतन्याचा उत्सव असलेला दिवाळी अर्थात प्रकाशपर्वाचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र साकेगाव येथे रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून साकेगावकर अंधारात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात अंधार असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.काळा हनुमान मंदिर परिसराजवळ असलेले रोहित्र गेल्या आठ दिवसांपूर्वी जळाले होते. या ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आले. मात्र तीन-चार तास विद्युत पुरवठा केल्यानंतर पुन्हा नवीन रोहित्रही जळाले. त्या दिवसापासून गावातील धनगरवाडा, गांधी चौक परिसराचा काही भाग, वाल्मीक मंदिर परिसर हा भाग पूर्णत: अंधारात आहे. प्रकाशपर्व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी आकाशकंदील, पणत्या लावून रोषणाई होत असताना मात्र वीजपुरवठा नसल्याने घरात अंधार निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.वीज चोरी मुळे रोहित्र जळालेया परिसरात विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करण्यात येते, असे वीज कंपनीचे म्हणणे आहे. परिणामी वारंवार रोहित्र जळण्यासारखे प्रकार होत आहे. असे असले तरी वीज चोरी करणाऱ्यांमुळे नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांना शिक्षा का, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.वीजचोरांवर कारवाई कराकाही लोक जर विजेची चोरी करत असतील तर त्याचा भुर्दंड इतर वीजधारकांनी का करावा, विशेष पथक बोलून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र जे नियमित वीजबिल बिल भरतात, त्यांचा वीजपुरवठा नियमित व सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा संतापजनक इशारा ग्रामस्थांकडून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला आहे.दरम्यान, प्रकाश पर्वात वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या परिसरात शेगडी, हिटरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मध्यंतरी अशांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कालांतराने पुन्हा शेगडी, हिटरचा वापर सुरू झाला. अशांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल. ज्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.-दिलीप कोल्हे, सहाय्यक अभियंता, वीज उपकेंद्र, साकेगाव, ता.भुसावळ

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ