शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मेहूणबारे येथे रंगले शिवार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:41 IST

मंदिरांच्या जागांवर विद्येची मंदिरे उभारली जावीत, असे विचार कवी, साहित्यिक उत्तम कोळगावकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशिवार पुजन करीत झाले संमेलनाचे उद्घाटनमंदिरांच्या जागांवर विद्येचे मंदिर उभारण्याचे आवाहनशेतीतील विविध प्रयोगांची दिली माहिती

मेहूणबारे, गणेशपूर,ता.चाळीसगाव : मंदिरांच्या जागांवर विद्येची मंदिरे उभारली जावीत, असे विचार कवी, साहित्यिक उत्तम कोळगावकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-चाळीसगाव आयोजित जिल्हास्तरीय शिवार साहित्य संमेलनात मेहुणबारे येथे अध्यक्षपदावरून ते बोलत होते. शेतकऱ्यांनी केवळ शेतीच्या आधाराने, भरवशाने राहू नये. आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे, कामधंदे सोडून देवाच्या नावाने बैठक मारून बसू नये, कर्मकांडात बुडू नये, डोळस असावे,कर्मकांड हेच आपल्या दु:खाचं कारण होऊ शकत म्हणून प्रत्येक गल्लीत मंदिरं बांधण्यापेक्षा विद्यामंदिरं बांधावीत असे ते म्हणाले.उद्घाटन कवी, गीतकार प्रकाश होळकर यांनी शिवार पूजन करुन केले. प्रसंगी आमदार उन्मेश पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, जि.प.सदस्या मोहिनी गायकवाड, कवी अशोक कोतवाल, प्रा.डॉ. प्र.ज.जोशी व मसाप चाळीसगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.परिसंवादच्या सत्रात कृषीभूषण लोहाºयाचे विश्वास पाटील लोहारा यांनी आपल्या शेतीत केलेल्या विविध प्रयोगांची माहिती सांगितली.डॉ.जे.सी.राजपूत, प्राचार्य डॉ. सुदाम पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ‘ नली ’ श्रीकांत देशमुख लिखित व हर्षल पाटील यांनी सादर केलेल्या एकपात्रीनं यावेळी उपस्थितांना रडवलं. डोळ्यांच्या कडा ओल्याच होत्या. प्रवीण माळी यांचे आयतं पोयतं सख्यान, डॉ.एस.के.पाटील यांच्या अहिराणी सादरीकरणांनी श्रोत्यांना लोटपोट केल.समारोपाला माजी आमदार आर.ओ.पाटील, प्रमोद पाटील,कैलास सूर्यवंशी यांनीही संमेलनाला हजेरी लावून मार्गदर्शन केले. बहुभाषिक कवी संमेलनात मान्यवर निमंत्रित कवींनी आपल्या शेत, शेतकरी, शिवार, दुष्काळ याविषयीच्या कविता सादर केल्या. गिरणामाई आणि तिचं कोरडं पात्रही शेतकºयांच्या व्यथा कान देऊन ऐकत होती.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगावFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र