शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सद्गुरु वाचोनि सापडेना सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:23 IST

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली ...

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली आहे. त्याचे तात्पर्य पाच तत्वांनी बनलेल्या शरीराचे नाही. कारण शरीर नाशवंत आहे. परंतु प्राप्त असलेल्या विवेकबुद्धी आणि विचारशक्तीमुळे ते श्रेष्ठ आहे.विवेक बुद्धीचा सदुपयोग करुन आपण मानव जीवनाचे कल्याण करु शकतो. पण देवदुर्लभ मानवी शरीर प्राप्त होऊनही आम्ही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि सांसारिक लोभातच जीवन व्यर्थ घालवितो. या मायामोहाच्या जंजाळात एवढं गुरफटून गेलो की यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.दु:खाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती! हा मनुष्य जीवनाचा खरा उद्देश असला पाहिजे. त्यासाठी गरज आहे ज्ञानाची. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसेच प्रभुचे ज्ञान झाले की, अज्ञान नाहीसे होते. या प्रभुला पाहिल्यावरच याच्याशी प्रेम करता येईल. म्हणूनच आवश्यकता आहे गुरुची. गुरु म्हणजे मनुष्य नव्हे तर मनुष्य रुपातील सगुण - साकार ईश्वरच होत.संत तुकाराम महाराज म्हणतातसद्गुरू वाचोनि सापडेना सोय,धरावे ते पाय, आधी आधी.मनुष्य जीवनाला सकारात्मक बदल करण्याचे कार्य सद्गुरू करतात. आणि यासाठीच सदगुरूंनी नितांत आवश्यकता आहे. संत नामदेव बालपणी विठ्ठलाशी बोलायचे-खेळायचे... भरवायचे परंतु त्या भक्तीला पूर्णत्व लाभले नाही. ज्यावेळी संत विसोबा खेचर स्वामींकडून त्यांना ज्ञान प्राप्त झाले, त्याचवेळी खºया देवाची ओळख झाली, मग संत नामदेवांनी ही भागवत पताका पंजाबात नेली.नामदेव महाराज म्हणतात आधी देवाशी ओळखावे...मग त्याशी अनन्यभावे भजावे....अखंडची ध्यान धरावे, सर्वोत्तमाचे ।सर्वोत्तम असणारा परमेश्वर याला अगोदर ओळखणे गरजेचे आहे. म्हणून निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज नेहमी म्हणायचे... एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. विश्वबंधुत्व निर्माण होण्यासाठी एका प्रभू परमात्म्याची ओळख होणे गरजेचे आहे. संत मिराबाई म्हणतात त्याप्रमाणे पायो जी मैने राम रतन धन पायो। अशीच अवस्था होत असते.संकलन- राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव