शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्याजवळ १८ लाखांच्या लुटीचा बनाव फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 01:45 IST

सबगव्हाण गावानजीक हवालाचे १८ लाख रुपये घेऊन येणाऱ्या एका कपाशी व्यापाºयाच्या माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून लुटल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.

ठळक मुद्देसबगव्हाण येथील घटनातीन जणांना अटकपोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला

पारोळा, जि.जळगाव : येथील आशिया महामार्ग ४६ वर सबगव्हाण गावानजीक हवालाचे १८ लाख रुपये घेऊन येणाऱ्या एका कपाशी व्यापाºयाच्या माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून लुटल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कथित रस्तालूट २४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली.याबाबत वृत्त असे की, चोरवड, ता.पारोळा येथील कपाशी व्यापारी सुभाष पाटील यांचे कपाशी व्यवसायाचे हवालाचे धुळे येथे आलेले १८ लाख रुपये भागवत चित्ते व अन्य एक जण दुचाकीने धुळे येथून पारोळा येथे आणत होते. सबगव्हाण गावानजीक दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकल थांबवून, त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्याकडील १८ लाख रुपये घेऊन पळ काढला, असे भागवत चित्ते याने पोलिसांना सांगितले. पण चित्ते हा हे सांगत असताना तो काही तरी बनाव करीत आहे, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला खरा प्रकार काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी ‘खाकी’चा हिसका दाखविला. तेव्हा चित्ते हा पोपटासारखा बोलू लागला. त्याने हा सर्व प्रकार बनाव केल्याचे लक्षात आले. खरा प्रकार उघडकीस आला. त्याने उंदिरखेडे, ता.पारोळा येथील संदीप परदेशी याने ही लूट केल्याची सांगितले. तेव्हा पारोळा पोलीस पथक हे उंदिरखेडे येथे गेले असता त्या ठिकाणी संदीप परदेशी नसून, तो दीपक परदेशी होता. त्याने घरातून १७ लाख ९६ हजार रुपये रोख रक्कम काढूून दिली.त्यासोबत आणखी एक अनिल बाबूसिंग परदेशी रा.चाळीसगाव हा उंदिरखेडे येथे बहिणीकडे आला होता. या बनावट लूट प्रकरणात भागवत चित्ते (वय ४३, रा.पारोळा, दीपक परदेशी (वय ३४, रा.उंदिरखेडे, ता.पारोळा), अनिल बाबूसिंग परदेशी (वय २३, रा.चाळीसगाव) या तिघांना पारोळा पोलिसांनी अटक केली.या वेळी पोलीस पथकात पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पंकज राठोड, विजय शिंदे, सुनील वानखेडे, अनिल वाघ आदींनी या बनावट प्लॅनमधील तिन्ही आरोपींना अटक केली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParolaपारोळा