शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रुस्तमजी इंटरनॅशनल, ओरियन स्कूल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 18:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज ट्रॉफी जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी ओरियन स्कूल आणि रुस्तमजी इंटरनॅशनलने विजय मिळवला. अनुभूती स्कूलच्या मैदानावर हे सामने झाले. सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात ओरियन स्कूलने ...

ठळक मुद्दे३ ओरियन स्कूलच्या आदित्य विसपुते याने हॅट्ट्रिक घेतली४८ पंकज ग्लोबल स्कूलच्या गोलंदाजांनी रुस्तमजी इंटरनॅशनलच्या संघाला दिलेल्या अतिरिक्त धावा.४ पंकज ग्लोबल स्कूलच्या राज पाटील याने चार गडी बाद केले.५ रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या निपूण जैन याने २४ धावात पाच गडी बाद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज ट्रॉफी जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी ओरियन स्कूल आणि रुस्तमजी इंटरनॅशनलने विजय मिळवला. अनुभूती स्कूलच्या मैदानावर हे सामने झाले. सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात ओरियन स्कूलने अनुभूती इंग्लिश स्कूलचा पराभव केला. अनुभूती स्कूलच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत सर्वबाद ४२ धावा केल्या. त्यात रोशन पवार याने ७ धावा केल्या अनुभूतीच्या संघाकडून ही सर्वोच्च धावसंख्या होती. ओरियनच्या गोलंदाजांनी तब्बल २४ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे अनुभूती स्कूलचा संघ ४२ धावांचा आकडा गाठू शकला. ओरियनच्या  आदित्य विसपुते याने हॅट्ट्रिक केली. हर्षवर्धन मालू  याने दोन तर ऋषिकेश माळी, गोविंद निंभोेरे, सुबोध खडके यांनी प्रत्येकी             १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात ४३ धावांचे माफक आव्हान ओरियन स्कूलच्या संघाने ५.४ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. त्यात गोविंद निंभोरे याने २३ धावा केल्या. तर पार्थ देवकर याने ६ धावांचे योगदान दिले. हॅट्ट्रिक घेणाºया आदित्य विसपुते याला सामनावीर घोषित करण्यात आले.  रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलने पंकज ग्लोबल स्कूलचा पराभव केला. रुस्तमजी स्कूलच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८.१ षटकांत सर्वबाद १०६ धावा केल्या.  त्यात यश गुंजन आणि आशिष पेहलानी यांनी १२ धावा केल्या. पंकज ग्लोबल स्कूलनेदेखील तब्बल ४८ अवांतर धावा दिल्या. पंकज स्कूलच्या राज पाटील याने ४ गडी बाद केले. आयुष पाटील याने २ गडी बाद करत त्याला साथ दिली. क्रिश पाटील याने १ गडी बाद केला. निर्धारीत २५ षटकांत १०७ धावांची गरज असताना पंकज स्कूलचा संघ ९.१ षटकांत ४१ धावांवर सर्व बाद झाला. रुस्तमजी स्कूलच्या निपूण जैन याने २४ धावा देत सर्वाधिक पाच गडी बाद केले. क्रिश याने दोन तर श्रीनिवास सिसोदे याने १ गडी बाद केला.पाच गडी बाद करणाºया निपूण याला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.