शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळला सत्ताधारी सदस्यांमध्येच सभेपूर्वी खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:54 IST

भुसावळ नगर पालिकेच्या मंगळवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि नगरसेविका पती यांच्यात प्रभागात कामे करण्याच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देविरोधी पक्ष जनाधार पार्टीने बहिष्कार होता टाकलापाणी प्रश्नी सदस्यांकडून गंभीर चिंता व्यक्त

भुसावळ : नगर पालिकेच्या मंगळवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि नगरसेविका पती यांच्यात प्रभागात कामे करण्याच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली, तर या सभेवर विरोधी जनाधार पार्टीने बहिष्कार टाकला. सभेत अवघ्या २५ मिनिटात ३५ विषयांना मंजुरी देण्यात आली.पाणी प्रश्नावर गंभीर चिंतापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला असला तरी, सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, युवराज लोणारी व नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासनाने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांमुळे ही सभा पंचवीस मिनिटे चालली . पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे होते तर व्यासपीठावर उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते. होते.सभेच्या अजेंड्यावर एकूण ३५ विषय होते . यातील विषय क्रमांक २७,२८ व २९ या तीन विषयावरील चर्चेच्या वेळी नगरसेवक कोठारी यांनी तापी नदीवरील बंधारा कामासंदर्भात आमदार संजय सावकारे यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली आहे . उन्हाळ्यात पाणीटंचाई संदर्भात समस्या सोडवण्याची चर्चा केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी बोलून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली.तसेच स्मशान भूमी व कब्रस्तानमध्ये स्वच्छतेसाठी रोजंदारीवर माणूस ठेवण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मांडली . त्यांच्या या सूचनेला नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी अनुमोदन दिले.दरम्यान , शहरात दहा ते बारा दिवसाआड पाणी येत असल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी सूचना नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी मांडली. महिला नगरसेविका असल्यामुळे महिलांच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . त्यामुळे हा प्रश्न ताबडतोब सोडविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. तर नगरसेवक लोणारी व प्रमोद नेमाडे यांनीही काही सूचना मांडल्या. मात्र सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगून सभा संपल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी जाहीर केले.जनाधार पार्टीचा बहिष्कार पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मनमानी व तत्कालीन मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्या हुकूमशाहीमुळे जनाधार पार्टीचे नगरसेवक व नगरसेविका अपात्र झाले असल्याचा आरोप करून आजच्या सर्वसाधारण सभेचा जाहिर निषेध करून या सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र उपगटनेते शेख जाकीर सरदार यांनी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना सभेपूर्वीच दिले होते. व त्यानंतर जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकून ते अनुपस्थित राहिले.दरम्यान, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी पाण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव नसल्याचे सभेत सांगितले, मात्र या उत्तरावर मी समाधानी नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दिली. पाण्याची गरज शहराला आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने रेल्वेच्या अधिकाºयांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत शहराला गरज आहे रेल्वेला नाही असा दावा लोकमतशी बोलताना त्यांनी केला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका