शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आतातरी राज्यकर्त्यांनी जागे व्हावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:06 IST

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा ...

सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा या दुर्घटनेचा ठपका थेट सरकारवर ठेवण्याचा आतातायीपणा विरोधक किंवा माध्यमांनीही केला नव्हता. मात्र आता या युती सरकारला सत्तेत येऊन पूर्ण पाच वर्ष होत आहेत. तरी सुद्धा हे सरकार किती बेजबाबदार आहे, हे नुकत्याच झालेल्या दुर्घटनांवरून दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यात तिवणे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. हा आकडा माध्यमांनी सांगितला आहे. नक्की कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकतात. तसच पुणे, मुंबई येथे श्रीमंतांचे निवासस्थान असलेल्या गृहकुल योजनेतील कुंपणाच्या आवाढव्य भिंती गरीबांच्या झोपड्यांवर कोसळून त्यातही हकनाक बळी गेले. या व अश्या सर्व दुर्घटनांना नक्कीच सरकारची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम ही खाती करतात तरी काय असा पडला आहे. राज्यातील युती सरकार तर सर्वच बाबतीत नापास ठरले आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा औद्योगिक विकासही ठप्प झाला आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारची अनुभवहीनता आहे. त्यामुळे आता तरी सरकारने विकास कामे सुरु करुन गोरगरीब जनतेची दुवा घ्यावी. कारण शहरातील परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रामले आहेत.-सतीश रामकृष्ण खडके, विठ्ठलपेठ, जळगाव.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव