शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरुद्ध लढण्यास संघ असमर्थ : ब्रिगेडिअर सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:16 IST

अजित पवारांना वाचविण्यासाठी शरद पवारांचा भाजपला पाठिंबा दिल्याची जळगावात केली टीका

ठळक मुद्देशरद पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपा सरकार उभेराफेल विमान घोटाळा बोफोर्सपेक्षा मोठाराफेल विमान खरेदीबाबत राहुल गांधी केवळ बोलतात, मात्र ते मोदींचे नाव घेत नाहीत.

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१४ : सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याबद्दल वक्तव्य करून सैन्याचा घोर अपमान केला असून याबद्दल त्यांचा निषेध करीत आहे. तीन दिवसात सैन्य उभे करण्याची भाषा करणारे भागवत हे खेळण्यातील बंदुकीसाठी फिट असून दहशदवादाविरुद्ध लढण्यास ते असमर्थ आहेत, अशी टीका आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रमुख ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी त्यांच्यावर केली आहे.पक्षाची संघटन स्थिती, तयारी व पक्षाच्यावतीने २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जळगाव येथे होणाºया नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती प्रशिक्षण शिबिराच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेडिअर सावंत हे १४ रोजी जळगाव येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आघाडी तसेच युती सरकारवर वेगवेगळे आरोप केले.राफेल विमान घोटाळा बोफोर्सपेक्षा मोठाराफेल विमान घोटाळा कोट्यवधींचा असून तो बोफोर्स घोटाळ््यापेक्षा मोठा आहे, असा आरोप या वेळी ब्रिगेडिअर सावंत यांनी केला. ते म्हणाले हा करार काँग्रेस सरकारने केला होता. यात १२६ विमान खरेदीचा करार असताना प्रत्यक्षात केवळ ३६ विमाने आली व तीदेखील तीन पट किंमतीने खरेदी करण्यात आले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी यांना पॅरीसला घेऊन गेले व कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता तेथे अंबानींना ठेका देण्यात आला. यात लष्काराच्या गुप्ततेच्या नियमांचाही मोदींनी भंग केला असून एकप्रकारे त्यांनी देशद्रोहच केल्याचा आरोप सावंत यांनी केला. यामध्ये राहुल गांधी केवळ बोलतात, मात्र यात ते मोदींचे नाव घेत नाही, असे सांगून त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाना साधला.शरद पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपा सरकार उभेराजकारणात शरद पवार यांच्यासारखा दुटप्पी माणूस मी पाहिलेला नाही. ४० वर्षे संविधान तुडविले व तेच संविधान बचाव म्हणत रॅली काढत आहे, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली. अजित पवार यांना वाचविण्यासाठी शरद पवार यांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिला असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

टॅग्स :JalgaonजळगावAam Admi partyआम आदमी पार्टी