शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘अंतर्नाद’तर्फे गणेशोत्सवांतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:10 IST

उपेक्षित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गोळा करून देणार

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवांतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. गरजू शाळा निवडून त्या ठिकाणी अध्ययन करणारे गोरगरीब विद्यार्थी हुंडकायचे. त्यांना पाटी, वह्या, दप्तरे, पेन, पेन्सील, कंपासपेटी, गणवेश अशा कोणत्या साहित्याची गरज आहे, त्याची नोंद करायची. दात्यांनी केलेल्या मदतीतून ते साहित्य पुरवायचे, असा हा उपक्रम आहे.गणेशोत्सवाचे पावित्र्य राखून अनाठायी खर्च टाळून तो सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा, यासाठी अंतर्नादने गेल्या वर्षांपासून ‘समर्पण गणेशोत्सव’ उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. मूतीर्ची उंची वाढवण्याची स्पर्धा, डोळ्यांना त्रास होईल असा अनावश्यक रोषणाईचा झगमगाट, डीजेचा दणदणाट, कर्णकर्कश संगीत यांच्यावर जो अनावश्यक खर्च होतो त्यात बचत करून गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य भेट द्यावे, या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्यावर्षी ६ शाळांत उपक्रमभुसावळ हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा निंभोरो बुद्रूक, भगिरथी प्राथमिक विद्यामंदिर भुुसावळ, जोगलखेडा, भानखेडा, कंडारी, श्री गाडगेबाबा हायस्कूल भुसावळ अशा सहा ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात ४५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून या वर्षी उपक्रमाला व्यापक स्वरुप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चोपडा, यावल, भुसावळ, धरणगाव अशा चार तालुक्यातील दात्यांचे सहकार्य लाभले होते.मातीच्या मूर्र्तींसाठी प्रोत्साहनपर्यावरण संवर्धनाचा विचार रूजण्यासाठी यंदा प्रतिष्ठानतर्फे शाडूमातीच्या गणेशमूर्ती स्थापनेला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यालाच ‘एक दुर्वा समर्पणाची’ या संकल्पनेची जोड देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला जो प्रतिसाद मिळाला त्यातून उत्साह वाढला. ‘लेक वाचवा’ अभियानाचे पुरस्कर्ते तथा धरणगाव महाविद्यालयाचे प्रा.वा.ना.आंधळे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली होती. यंदा व्यापक स्वरुप दिले आहे, असे प्रतिष्ठानने कळविले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक