जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : जामठी येथे रोजगार सेवक नसल्याने मग्रारोहयो योजनेंंतर्गत कामे रखडली आहेत.येथे मग्रारोहयो योजनेंंतर्गत सिंचन विहिरी, वैयक्तिक शौचालय, प्रस्तावित असलेली रस्त्याची व नाला खोलीकरणांची कामे ही येथे रोजगार सेवक उपलब्ध नसल्याने थंड बस्त्यात पडलेली आहेत. यामुळे लाभार्र्थींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गावातील काही मजुरांचे जॉब कार्ड बनविणे, शौचालयाचे व विहिरींची बिले बनविणे तथा आॅनलाईन करणे आदींसारखी कामेही रखडलेली आहेत.यासंदर्भात ग्रामसेवक गोविंद राठोड यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच या रोजगार सेवकाचा राजीनामा घेण्यात येणार आहे. त्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, येथील रोजगार सेवक अमोल माळकर यांना दुसरीकडे नोकरी लागली असता हा कारभार सोडत असल्याचेही ग्रामसेवकांनी सांगितले. मात्र कायम रोजगार सेवक उपलब्ध नसल्याने येथील रोहयोची अनेक कामे रखडलेली आहे. त्यामुळे लाभार्र्थींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित नवीन रोजगार सेवकाची नियुक्ती करावी व रोहयोची रखडलेली कामे पूर्व पदावर आणावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.
जामठी येथील ‘रोहयो’ची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:46 IST
जामठी येथे रोजगार सेवक नसल्याने मग्रारोहयो योजनेंंतर्गत कामे रखडली आहेत.
जामठी येथील ‘रोहयो’ची कामे रखडली
ठळक मुद्देरोजगार सेवक नसल्याने उद्भवली समस्यारोजगार हमीची अनेक कामे थंड बस्त्यात पडूनतातडीने रोजगार सेवक नियुक्त करण्याची मागणी