शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसेंना टाळून रोहिणी खडसेंना उमेदवारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:05 IST

मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे विधीमंडळ सभागृहात आले तर होणारी पक्षांतर्गत संभाव्य अडचण आणि त्यांची उमेदवारी कापल्यास त्यांच्याकडून होणारे ...

मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे विधीमंडळ सभागृहात आले तर होणारी पक्षांतर्गत संभाव्य अडचण आणि त्यांची उमेदवारी कापल्यास त्यांच्याकडून होणारे उपद्रव मूल्य लक्षात घेता त्यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी भाजपने चालविली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.याबाबत खडसे कुटुंबीयांमध्ये चर्चादेखील घडली असल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात खडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही सायंकाळपर्यंत काहीही माहिती देणे टाळले. तर खडसेंना राज्यपाल पदही देण्याची चर्चा आहे. तर बुधवारी सकाळपासून खासदार रक्षा खडसे मुंबईत आहेत. त्यांनी दुपारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचे समजते. खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे समजते. रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका खडसे परिवारातून घेतली जाईल, असा कयास आहे. दरम्यान, हा तिढा सुटताच भाजपची दुसरी अंतिम यादी जाहीर होईल, असाही मतप्रवाह आहे. तर खडसे हे रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत असल्याचेही समजते.