शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यात मालट्रकवर दरोडा, गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:26 IST

मुक्ताईनगर , जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली बेलासवडी रस्ता दरम्यान धामणदे फाट्यावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास सिनेस्टाईल दरोडा टाकून ...

ठळक मुद्देचालकाच्या पोटात दरोडेखोरांनी मारला चाकूसहचालकावर तोंडात घातल्या दोन गोळ्याएक गोळी तोंडाच्या जबड्यातून निघाली आरपार

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली बेलासवडी रस्ता दरम्यान धामणदे फाट्यावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास सिनेस्टाईल दरोडा टाकून मालट्रक लुटली. दरोडेखोरांनी ट्रकचालकाच्या पोटात चाकू घातला, तर क्लिनरच्या तोंडात दोन गोळ्या झाडल्या. सिनेस्टाईल दरोड्यातील जखमी क्लिनरला उपचारास इंदूर (मध्य प्रदेश) येथे हलविण्यात आले आहे. गोळीबार करून दरोडा घातल्याच्या या घटनेत कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहेघटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे तपासाचा मार्ग शोधत आहेत, तर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी जळगाव येथून घनस्थळाकडे निघाले आहेत.दरोडेखोरांनी क्लिनर अलीम सलीम शेख (वय २५, रा.अकोला) याच्या तोंडात दोन गोळ्या झाडल्या आहेत. त्याच्या तोंडातून एक गोळी बाहेर पडली. बºहाणपूर येथे प्रथमोपचार करून त्यास इंदूर येथे हलविण्यात आले आहे, तर चालक मोहंमद इलियास मुक्तार शेख (वय २५, रा.अकोला) याच्या पोटात चाकू मारला गेला, त्यावर अंतुर्ली येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी त्यांच्याकडून घटनेची माहिती घेत आहे. दरम्यान, चालकासही पुढील उपचारासाठी बºहाणपूर येथे हलविण्यात आले आहे.प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री काळ्या रंगाच्या चारचाकीमधून पाचच्या संख्येतील दरोडेखोरांनी अंतुर्ली बेलासवडी दरम्यानच्या रस्त्यावर धामणदे फाट्यालगत अकोला येथून इंदूर जाणाऱ्या माल ट्रक (क्रमांक एमपी-०९-सीएफ-९६७६) यास थांबवून ट्रकचालक व क्लिनरवर धाव बोलला. ड्रायव्हरच्या पोटात चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले, तर उजव्या बाजूने हल्ला चढविणाºया हल्लेखोराने क्लिनर अलीम याची आरडाओरड पाहता थेट त्याच्या तोंडातच गोळ्या झाडल्या. तपासणी नाके चुकवून चोरट्या मार्गाने वाहतूक करणाºया या वाहनचालक व क्लिनरच्या जीवावर ही आडमार्गाची वाहतूक बेतली तर कमी वर्दळीच्या रस्त्यावर दरोडेखोरांनी सावज घेरले.दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर रावेर, मुक्ताईनगर, बºहाणपूर या भागात नाकेबंदी लावण्यात आली आहे. या भागात हॉटेल व धाब्यावर कसून तपासणी करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMuktainagarमुक्ताईनगर