शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या धाडसाने दरोडेखोरांचा डाव फसला..!

By सागर दुबे | Updated: March 30, 2023 15:44 IST

मुक्ताईनगरातील प्रकार ; रात्री वकीलाने गाठले पोलिस ठाणे

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव :  शहरातील मुक्ताईनगर नगरात मुलगी घरी एकटे असल्याची संधी साधून पिण्यासाठी पाणी मागत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र घरात 'त्या' दहा वर्षीय चिमुकलीने धाडस दाखविल्यामुळे हा दरोडेखोरांचा दरोड्यांचा प्रयत्न फसल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. पाणी पाज नाही तर दरवाजा तोडून आत येवू अशी धमकी दिली. पण, मुलीने अजिबात न घाबरता दरवाजा न उघडून हिंमत दाखविली आणि दरोडेखोरांना परतवून लावले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुक्ताईनगरात एस.एम.आय.टी. महाविद्यालाजवळ ॲड. सचिन देविदास पाटील (४३) हे पत्नी विद्या पाटील व दहा वर्षीय मुलगी श्रृंगी यांच्यासह वास्तव्यास आहे. पाटील यांच्या पत्नी पत्नी शिक्षिका आहेत. बुधवारी पाटील दाम्पत्य कामावर निघून गेले होते. दुपारी श्रृंगी ही शाळेतून घरी परतली, ती घरी एकटीच होती. दुपारी २ वाजता काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरी आले. त्यातील एकाने दरवाजा ठोठावला. लोखंडी ग्रिलींगच्या दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते, आवाज ऐकून श्रृंगी हिने लाकडी दरवाजा उघडला. त्यातील एका दरोडखोराने पिण्यासाठी पाणी मागितले, अनोळखी वाटत असल्याने तिने पाणी देण्यास नकार देवून तुम्ही इथून जा असे सांगितले आणि दरवाजा बंद केला.

पण, त्या व्यक्तीने पाणी पाज नाहीतर दरवाजा तोडून आतमध्ये घूसेल असे मुलीला धमकाविले. मात्र, तिने हिंमत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही. तब्बल १५ मिनिट दरोडेखोर दरवाजाजवळ थांबून होता. पण, मुलीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तिने खिडकीतून बाहेर डोकवून पाहिल्यावर झाडाखाली एका रिक्षात आणखी चार ते पाच जण दिसले. त्यातील एक जण 'प्लॅन सक्सेस झालाय' असे बोलत असल्याचे तिने ऐकले. अखेरपर्यंत श्रृंगीने कुठलाही प्रतिसाद न देता दरवाजा उघडला नाही, त्यानंतर दरोडेखोर आल्या मार्गाने निघून गेले.पालकांनी घराकडे घेतली धाव..

दरम्यान, खिडकीतून श्रृंगीने शेजारच्यांना आवाज दिला. शेजारीची महिला धावत श्रृंगी हिच्याकडे आली. मुलीने सर्व प्रकार महिलेला सांगितला. नंतर विद्या पाटील ह्या सुध्दा घरी आल्या व सायंकाळी ॲड. सचिन पाटील हे सुध्दा घरी परतले. श्रृंगी हिने तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत पालकांना सांगितली. सर्व ऐकून ॲड.पाटील हे सुध्दा अवाक झाले. रात्री रात्री दहा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. रात्री बारा वाजता पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकाराचा पोलिस तपास घेत असून दरोडखोर हे साध्या रिक्षातून नव्हे तर पिंक रिक्षातून आले असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalgaonजळगाव