शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम अन् दोन्ही खांबांमुळे वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:37 IST

नव्यानेच मंजूर झालेल्या जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे. कजगावात सुरू झालेल्या या कामास रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व टेलिफोन खांब यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. या खांबांमुळे दिवसभर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभडगाव तालुक्यातील कजगाव येथे निर्माण झालाय वाहतुकीचा प्रश्नपथदिव्याचा व टेलिफोन खांब हटविण्याची आवश्यकतावाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारीही गरज

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : नव्यानेच मंजूर झालेल्या जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे. कजगावात सुरू झालेल्या या कामास रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व टेलिफोन खांब यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. या खांबांमुळे दिवसभर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी हे दोन्ही खांब तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून होत आहेजळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू झाले आहे. हे काम कजगाव या मुख्य बाजारपेठेतून मध्यभागातून जात आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या या कामास रहदारीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्यालगत असलेले धनश्री व्यापारी संकुलासमोरील (पथदिव्यांचा खांब) व टेलिफोन खांब हे दोघे खांब रस्त्याच्या कडेला लागून असल्याने रहदारीचा खोळंबा झाला आहे.याच मार्गावर काही अंतरावर एक ट्रान्सफार्मर आहे. रस्त्यालगत बसलेले काही हातगाडीचालक, काही किरकोळ विक्रेते यामुळे रहदारीसाठी मोठी अडचण येथे होत आहे. अनधिकृत रस्त्यालगत बसलेल्या या किरकोळ विक्रेत्यांनी आपला व्यवसाय मागे थाटला तर रहदारीचा प्रश्न सुटेल, मात्र त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांनी आपली दुकान रस्त्यालगत थाटली आहेत.या सर्वच बाबीचा पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्तरित्या कारवाई केल्यास रस्त्याचे कामही सुरळीत व चांगले होईल. बरोबरच वाहतुकीची मोठी समस्या दूर होईल.हातगाडी, लोटगाडी, किरकोळ विक्रेते, प्रवासी वाहतूक करणारी वाहन या साऱ्यांचा बाजाराच दिवस उजाडल्यापासून रस्त्यावर भरत असतो. यामुळे कजगावात बाजार नसतानाही बाजार वाटतो. त्यात वाढलेली रहदारी यामुळे दिवसभर वाहनधारकांत शाब्दिक वाद होतात. हे वाद मिटवायला येथे खाकीच नाही. यामुळे खाकीचा धाकदेखील संपलेला आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhadgaon भडगाव