शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेची रस्ते सुरक्षा समिती केवळ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:59 IST

पाच महिन्यांपासून एकही बैठक नाही : रस्ते दुरुस्तीचा विषय दुरच, रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर

जळगाव : शहरातील अपघातप्रवण क्षेत्रातच्या (ब्लॅक स्पॉट) ठिकाणी अपघात होवू नये याकरिता स्थापन करण्यात आलेली मनपा रस्ता सुरक्षा समिती केवळ नावालाच आहे. कारण गेल्या पाच महिन्यांपासून या समितीची कोणतीही बैठक झाली नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.शहरात रस्त्यांचा प्रश्न भयंकर झाला असताना समितीची कोणतीही बैठक न झाल्याने मनपा प्रशासन रस्त्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या नगरविकास विभागाकडून सर्व महानगरपालिकांना २६ आॅक्टोबर परिपत्रक पाठविण्यात आले होते. रस्ते सुरक्षतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून ही समिती स्थापन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, समिती झाली असल्याचे मनपाकडून जरी सांगितले जात असले तरी या समितीची बैठक झालेली नाही. याबाबत मनपाच्या एका अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या कार्यकाळात एक बैठक झाली होती. त्यानंतर समितीची बैठक झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.खड्डयांचा प्रश्नावर गांभिर्यच नाहीस्थापन समितीकडून वर्षातून दोन वेळा शहरातील रस्त्यांचा सुरक्षेसंदर्भात पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना मनपाने कराव्या लागतात. तसेच अपघात प्रवण ठिकाणांची दुरुस्ती प्राधान्याने करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. सध्या शहरातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डयांची समस्या पाहता मध्यवर्ती शहरातील रस्ता असो वा उपनगरातील रस्ता वाहनधारकांसाठी धोकेदायक ठरत आहे. मनपा प्रशासनाला जर याबाबत गांभिर्य राहिले असते तर रस्त्यांची दुरुस्ती केली गेली असते. दरम्यान, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन व नागरी हितसंवर्धन बहुउद्देशिय समितीकडून याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देवून समितीची बैठक नियमित व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.मनपा आयुक्तांसह आरटीओंचा आहे समावेशसर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायमुर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले होते. शासनाच्या निर्देशाप्रमाणे या समितीत मनपा आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारर, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विभाग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधी व मनपातील अभियंता यांचा समावेश या समितीत आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव