शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने व्यापला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:19 IST

दुचाकींचे अतिक्रमण

रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे स्टेशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून सकाळपासून ठिकठिकाणी दुचाकींचे अतिक्रमण असते. परिणामी स्थानकामध्ये यायला आणि जायलही जागा रहात नाही. उभ्या आडव्या दुचाकींमुळे पडण्याचीदेखील शक्यता असते. विशेष म्हणजे महिला प्रवाशांना तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दररोज दिसून येते. गेल्या आठवड्यात तर दुचाकी पार्किंगवरुन मोठा वाद झाला. एकमेकांच्या दुचाकींचा त्यांना थोडादेखील धक्का सहन झाला नाही. लगेच ते हमरी-तुमरीवर आले होते. अशा प्रकारे या अतिक्रमणामुळे अधून-मधून वाद उद्भभवत आहेत. सकाळी पॅसेंजर आल्यावर तर रिक्षावाले प्रवाशी घेण्यासाठी रस्त्यावरच उभे असतात. यामुळे अधिकच गर्दी होते. अनेकवेळा रिक्षाचालकदेखील स्टेशनमध्ये नातेवाईकांना सोडण्यासाठी आल्यावर दुचाकींसह रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रतेही बसलेले असतात. यामुळे स्टेशनसमोरील कोंडीत अधिकच भर पडत आहे. पूर्वी बॅरिकेटस् नसल्यामुळे प्रवासी थेट दादऱ्यापर्यंत दुचाकी आणत होते. मात्र गेल्यावर्षी बॅरिकेटस् बसविल्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या लावत आहेत. रेल्वे पोलीसही या विक्रेत्यांवर कारवाई करीत नाही. पोलीसच कारवाई करीत नसतील तर इतर प्रवाशी कशाला बोलतील, असा सवाल अनेक वेळा उपस्थित होतो. जर एखाद्या प्रवाशाने विरोध केला तर वाद घडण्याची भिती असते. त्यामुळे प्रवाशीदेखील दुर्लक्ष करतात. वाहनांच्या अतिक्रमणावरुन मोठा वाद झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.- अजय वाघ, प्रवासी.

टॅग्स :Jalgaonजळगाव